निलंगा : निराधार लाभार्थ्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसणार असल्याने त्या शासन निर्णयाची निलंगा तहसीलसमोर होळी करून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. निराधाराच्या विरोधात घेतलेल्या निर्णयामुळे लाभार्थ्यांत प्रचंड आक्रोश निर्माण झालेला आहे.निराधार संघर्ष समिती रस्त्यावर उतरली असून त्यांच्या हक्कासाठी २८ तारखेला एक लाख नागरिक रस्त्यावर आणणार असल्याचे राजेंद्र मोरे, राजकुमार होळीकर ,बाबासाहेब बनसोडे व मोर्चा समन्वयक राजीव कसबे यांनी यांनी सांगितले.
प्रारंभी निलंगा तहसीलदार यांना शिष्टमंडळाने भेट घेऊन तालुक्यातील निराधारांना नाहक त्रास होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी अशी मागणी केली .यावेळी निलंगा तालुका समन्वयक दत्ता सूर्यवंशी, धनाजी दोरवे, बबलू जाधव यांच्यासह मोर्चा समन्वयक बाबासाहेब बनसोडे,दीपक गंगणे,शरीफ पठाण, श्याम जाधव, सचिन शिंदे,संभाजी कांबळे, गौतम कांबळे, शीतल तमलवार,सुमन कांबळे मोहिनी कांबळे, सुरेखा आयवळे, पूजा सर्जे,दगडू बरडे, शेषराव गायकवाड, हेमंत पाटील, शिवाजी बीबीनवरे आदी उपस्थित होते.