25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeलातूरअंथरुणास खिळलेल्या व्यक्तींचे घरी जाऊन लसीकरण

अंथरुणास खिळलेल्या व्यक्तींचे घरी जाऊन लसीकरण

एकमत ऑनलाईन

लातूर : पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहरातील अंथरुणास खिळलेल्या, शारीरिक हालचाल करता न येणा-या व्यक्तींना आता महापालिकेच्या वतीने घरी जाऊन कोविड-१९ लसीकरण केले जाणार आहे. यासाठी संबंधितांच्या नातेवाईकांनी पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.

अनेक व्यक्ती गंभीर आजारकिंवा व्याधींमुळे हालचाल करु शकत नाहीत. त्यामुळे कोविड-१९ लस घेण्यासाठी ते लसीकरण केंद्रापर्यंत येवू शकत नाहीत. अशा व्यक्ती आजवर लसीकरणापासून वंचित राहत होत्या. अंथरुणास खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणा-या व्यक्तींसाठी त्यांच्या घरी जावून कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून मार्गदर्शक सुचना कळविण्यात आलेल्या आहेत. अशा रुग्णांना फक्त कोवॅक्सीन लस दिली जाणार आहे.

अशा नागरिकांना लसीकरणापूर्वी त्यांचे नियमित उपचार करणारे डॉक्टर किंवा फिजीशियन यांचे ती व्यक्ती अंथरुणाला खिळुन असल्याचे व पुढील ६ महिने याच अवस्थेत राहण्याची शक्यता असल्याबाबत वैदयकीय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. संबंधित व्यक्ती अथवा त्याची देखभाल करणा-या घरातील व्यक्तीकिंवा नातेवाईकाने कोविड-१९ प्रतिबंधक लस घेण्याची ईच्छा असल्याबाबत व हरकत नसल्याबाबतचे हमीपत्र सादर करावे लागणार आहे. या वैद्यकीय प्रमाणपत्राची पुर्तता करुन अंथरुणास खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणा-या आणि लसीकरणासाठी इच्छुक व्यक्तीचे किंवा रुग्णाचे नाव, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळुन असल्याचे कारण आदी माहिती लातूर शहर महानगरपालिकेच्या [email protected] या ई-मेल संकेतस्थळावर किंवा ९१५८६३२३३३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून महानगरपालिकेला द्यावी, अशा नागरीकांच्या लसीकरणाचे पुढील नियोजन करता येवू शकेल, असे आवाहन लातूर मनपामार्फत करण्यात आले आहे.

अतिहव्यासाचा ‘डर्टी पिक्चर’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या