24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरजिल्हा बँकेची विम्यासाठी शेतक-यांना घरपोच सुविधा

जिल्हा बँकेची विम्यासाठी शेतक-यांना घरपोच सुविधा

एकमत ऑनलाईन

लक्ष्मण पाटील  निलंगा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात शेतकºयांना विमा भरण्यासाठी आडचण निर्माण होऊ नये यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निलंगा मुख्य शाखेच्या वतीने तालुक्यातील १५ गावातील २३०० शेतक-यांच्या घरी जाऊन पिक विमा भरून घेण्यात आला.

लातूर जल्हिा मध्यवर्ती च्या निलंगा तालुक्यामध्ये एकूण पंधरा शाखा असून त्यात पासष्ठ कर्मचारी कार्यरत आहेत शिवाय १०० विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत़ सद्यस्थितीला लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दि १५ ते ३० जुलै दरम्यान लॉकडाऊन करण्यात आले आहे.

या दरम्यान शेतक-यांना खरीप पीक भरण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. लॉकडाऊन मुळे प्रत्यक्ष शेतकºयांना बँकेत जाण्यासाठी आडचण येत असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँक आपल्या दारी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे . यात जिल्हा बँकेचे कर्मचारी व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन व गट सचिव प्रत्येक गावात पीक विमा भरून घेण्याचे काम करीत आहेत.

त्यात तालुक्यातील १०० विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व अंतर्गत गावातील पिक विमा भरून घेतला जात आहे यात शहरातील मुख्य शाखेच्या शाखा व्यवस्थापक एस डब्ल्यू बगदुरे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ गावातील २३०० शेतकºयांच्या घरी जाऊन १६ लाख ५४ हजार ४७० रुपये विमा रक्कम जमा करून घेण्यात आली. याप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक शाखेतील कर्मचारी व सोसायटीचे चेअरमन आणि गटसचिव पीक विमा भरून घेण्याचे काम करीत आहेत.

कोरोनाच्या भीतीमय वातावरणात बँकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे शेतकरी वर्गातून स्वागत केले जात आहे.
याकामी बँकेचे मुख्य कार्यालयाचे कर्ज व्यवस्थापन व्ही.जी. शिंदे, तालुका फिल्ड आॅफिसर संजय माने , एम एच शिंदे, आर डी लोभे, एस. व्ही स्वामी, श्रीमती डि. एस. देवसाळे, श्रीमती व्ही. एम. माने , बँकेचे कर्ममचारी , सोसायटीचे चेअरमन व गट सचिव परिश्रम घेत आहेत.

शेतक-यांनी सोसायटीत विमा भरुन घ्यावा
निलंगा शहरासह तालुक्यातील सर्व शाखेअंतर्गत शेतकºयांनी कोरोना महामारीमुळे पिक विमा भरण्यासाठी गावाबाहेर न येता बँकेच्या वतीने प्रत्येक गावामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे कोणताही शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहू नये यासाठीच घरी जाऊन विमा भरून घेण्याचे काम सुरू आहे. आमचे कर्मचारी जिवाची पर्वा न करता शेतकºयांना मदत करीत आहेत. विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असून सर्व शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा बँकेचे कर्मचारी सोसायटीचे चेअरमन व गट सचिव यांच्याशी संपर्क करून वेळेत भरून घ्यावा असे आवाहन लातूर मुख्य कार्यालयाचे कर्ज विभागाचे व्यवस्थापक व्ही. जी. शिंदे व तालुका फिल्ड आॅफिसर संजय माने यांनी केले आहे.

पिक विमा भरण्यासाठी जिल्हा बँंकेने १२० शाखेअंतर्गत केली गावात सोय
सध्या कोरोना महामारी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी विविध स्थरावर सरकार विविध संस्था प्रयत्न करित असताना शेतकरी सभासदांना पिक विमा भरण्यासाठी अडचण होवू नये यासाठी माजी मंत्री सहकारी महर्षि तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या लातूर जिल्हा बँकेने थेट शेतकºयांचा पिक विमा हप्ता भरून घेण्यासाठी गावात जावुन स्वीकारत आहे़ कोरोनाच्या महामारी काळात शेतक-यांना मोठा दिलासा मिळत असुन यामूळे लातूर जिल्हा बँकेचा वेगळा लातूर पॅटर्न पुन्हा एकदा राज्यात चर्चिला जात आहे.

पंतप्रधान खरीप पिक विमा भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या शाखेत गर्दी टाळावी यासाठी बँकेच्या प्रशासनाने गेल्या आठवडयापासून मुख्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी याना शाखा स्थरावर विमा हप्ता भरून घेण्यासाठी पाठवण्यात आले आहे़ प्रत्येक गावातील सोसायटीचे चेअरमन व गटसचिव यांच्यामार्फत बँक अधिकारी यांच्याकडून सुरक्षित अंतर ठेऊन पिक विमा हप्ता स्विकारत आहेत.

जिल्यातिल देवणी, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील वलांडी, साकोळ, येरोळ, शंभूउमरगा, दवणहिप्परगा, सावरगाव येथील शाखेस जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्विराज सिरसाठ, संचालक भगवानराव पाटील, व्यंकटराव बिरादार यानी भेटी देऊन पिक विमा भरण्यासंबधीची माहिती घेतली आढावा घेतला़ यावेळी तालुका फील्ड आॅफिसर भाटकर, शाखा व्यवस्थापक, तपासणीस, गटसचिव, सोसायटीचे चेअरमन उपस्तीत होते.

Read More  विवेकानंद रुग्णालयात कोरोना रूग्णांसाठी ४० खाटा आरक्षित

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या