30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeलातूरहोम क्वारंटाईन व्यक्तींचा गावात वावर

होम क्वारंटाईन व्यक्तींचा गावात वावर

एकमत ऑनलाईन

निलंगा :येथील नगरपालिकेच्या प्रभाग दोनमधील इनामवाडीत कोरोना संसर्गाने दोन व्यक्तीचा मृत्यू झाला असून कोरोना बाधित लोक होम कोरंटाईंच्या नावाखाली गावात बिनधास्तपणे संचार करीत असल्याने त्यांची इतरांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पालिका प्रशासनाने कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास कंटेन्मेंट झोन जाहीर करावा व कोरोना महामारीच्या सर्व उपाययोजना गावात लागू कराव्यात अन्यथा मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचे नगरसेवक विकास नाईकवाडे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे नेवदनाद्वारे मागणी केली आहे.

निलंगा शहरासह तालुक्यात कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता आलेख चढता आहे. त्यातच कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती होम कोरंटाईंच्या नावाखाली रस्त्यावर बिनधास्तपणे संचार करीत असल्याने त्यांचा संसर्ग दुस-या व्यक्तींना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निलंगा नगरपालिका हद्दीतील इनामवाडी हे गाव प्रभाग २ मध्ये आहे. या गावातील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवाय गावातील काही व्यक्तींना कोरण्याची लागण होऊनही पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे येथील कोरोनाबाधित व्यक्ती मुक्तपणे गावात संचार करीत आहेत. यामुळे दुस-या व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याकरिता पालिका प्रशासनाने इनामवाडी येथील कोरोना बाधीत व्यक्तीच्या घरातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्याची सक्ती करावी, चाचणीत कोरोनाबाधित आढळल्यास कंटेनमेंट झोन जाहीर करावा, ४५ वर्षांपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सर्व व्यक्तींना लस देण्यात यावी व कोरोना महामारीच्या सर्व उपाययोजना गावात तात्काळ करण्यात याव्यात अन्यथा मी नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचे निवेदनाद्वारे नगरसेवक विकास नाईकवाडे यांनी मुख्याधिका-यांकडे कळविले आहे.

नांदेड जिल्ह्यात १ हजार ३७५ बाधीतांची भर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या