24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeलातूरसिंधगाव येथील ६१ जणांना केले होमक्वारंटाईन

सिंधगाव येथील ६१ जणांना केले होमक्वारंटाईन

एकमत ऑनलाईन

पोहरेगाव : रेणापूर तालुक्यातील सिंंधगाव येथील ३ व्यक्तींचा बुधवारी कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव गावात पोहचल्याने ग्रामस्थांतून भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामध्ये २ पुरुष व १ महिलाचा समावेश असून त्यांना पुढील उपचारासाठी बावची येथील कोवीड सेंटरला हालविण्यात आले आहे.

बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे निवासी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.महेश कुलकर्णी यांनी तात्काळ भेट देऊन नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. रेणापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत असल्याने सर्वानी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे गावातील व्यक्तींना ताप,सर्दी व खोकला अशी लक्षणे जाणवल्यास घरीच न थांबता तात्काळ रुग्णालयाकडे तपासणी करणे गरजेचे असल्याचे डॉ.कुलकुर्णी यांनी सांगितले आहे.

या रुग्णाचे बुधवारी तपासणीनंतर व्यक्तींचे स्वॅब गुरुवारी पॉझीटीव्ह आले होते.त्यामुळे प्रशासनाकडून आरोग्य विभागातील कर्मचारी व आशा अंगणवाडीकडून दिवसभर अधिका-यासमवेत सर्व ग्रामस्थांची खबरदारी म्हणून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच या कोरोना बाधित व्यक्तीच्या घरातील व्यक्तीच्या संपर्कातील ६१ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या कोरोनाबाधित व्यक्तीच्या घराजवळील परिसर सील करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या