22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeलातूरजिल्ह्यातील २ हजार ७६ कुटुंबाचा गृहप्रवेश

जिल्ह्यातील २ हजार ७६ कुटुंबाचा गृहप्रवेश

एकमत ऑनलाईन

लातूर : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात दि. २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत महा आवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले. या अंतर्गत राज्यातील ३ लाख २२ हजार २२९ घरकुलाची कामे पूर्ण होऊन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई प्रातिनिधिक स्वरुपात पाच कुटुंबांना घरकुलाची चावी देऊन इतर सर्व कुटुंबाचा ई- गृहप्रवेश कार्यक्रम दुरचित्र प्रणालीद्वारे संपन्न झाला.

लातूर जिल्ह्यात या महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या १ हजार ७०९ मंजूर घरकुला पैकी ५३३ घरकुलाचे काम पूर्ण झाले तर राज्य पुरस्कार योजनेच्या २ हजार ८५९ मंजूर घरकुला पैकी १ हजार ५४३ घरकुलाचे काम पूर्ण झाले असून आज सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायत व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एकूण २ हजार ७६ कुटुंबांना घरकुलाच्या चाव्या देण्यात आल्या. जिल्हास्तरावरील कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष जोशी यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात घरकुलाची चावी देण्यात येऊन त्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात आले.

दि. २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत जिल्ह्यात महा आवास अभियान ग्रामीणची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येऊन प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर घरकुला पैकी ५३३ घरकुलाचे काम शंभर टक्के पूर्ण केले तर उर्वरित घरकुलाचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच राज्य पुरस्कृत घरकुल योजने अंतर्गत १ हजार ५४३ घरकुलाचे काम शंभर टक्के पूर्ण करून उर्वरित घरकुलाचे कामे प्रगतीपथावर आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.

या ई-गृह प्रवेश कार्यक्रमास मुंबई येथून ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार विनायक राऊत, खासदार राहुल शेवाळे, ग्रामविकास विभागाचे सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

चिंता लोकसंख्येतील असंतुलनाची

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या