22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeलातूरछत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त मोरे नगर मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त मोरे नगर मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त प्रभाग क्रमांक २५, मोरे नगर मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण सभापती गोविंद सुरवसे, इंजिनिअर राजकुमार नाईकवाडे हे उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी मांदळे अश्विनी ९५.२० टक्के, आरती जाधव ९६.६० टक्के, कांबळे अभिषेक ९०.८० टक्के, दासरे रुद्राक्ष ८७.२० टक्के, समुद्रे प्रतीक्षा ७१.४० टक्के गुण घेवून यश मिळविलेल्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी प्रभागातील प्रशांत कांबळे, नितीन तोडकरे, भानुदास कांबळे, राजेंद्र गायकवाड, सुरेश पालके, मनोज कांबळे, विकास कांबळे, ज्ञानोबा घंटे, माऊली जाधव, हरिभाऊ बुरांडे आदी गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व प्रभागातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षवर्धन सवाई यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या