27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरनियमित कर्ज परतफेड करणा-यांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन बळीराजाचा सन्मान

नियमित कर्ज परतफेड करणा-यांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन बळीराजाचा सन्मान

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्ज परतफेड करणा-या बळीराजाला ५० हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेऊन राज्यातील १४ लाख शेतकरी कुटुंबाना दिलासा दिल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे.

नियमित कर्ज परत फेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहन रक्कम देण्याचे आश्वासन देऊनही महाविकास आघाडी सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. ठाकरे सरकारमुळे निराश झालेल्या शेतक-यांस या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे १४ लाख शेतक-यांच्या सहा हजार कोटींच्या कर्जाचा बोजा हलका होणार असून थेट ऑनलाईन पद्धतीने अनुदानाची रक्कम शेतक-यांस मिळणार असल्याने मदतीसाठी हेलपाटे न घालता शेतक-यांची प्रतिष्ठा जपण्याची सरकारची भावना महत्वाची आहे, असे सांगून आमदार रमेश कराड म्हणाले की २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अतोनात नुकसान झालेला शेतकरी प्रत्यक्षात अडीच वर्षे मदतीपासून वंचित राहिला होता. या आपत्तींनंतरच्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतक-याला देखील भाजप-सेना युती सरकारच्या नव्या प्रोत्साहनपर योजनेत समाविष्ट केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या