24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतील गुणवंताचा सत्कार

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतील गुणवंताचा सत्कार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२१ च्या स्पर्धा परीक्षेतील लातूर जिल्ह्यातील यशस्वी गुणवंताचा गौरव जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, गेल्या वर्षी ज्यांनी हे यश संपादन केलं आणि सध्या आयएएसचे प्रशिक्षण घेत आहेत ते विनायक महामुनी, कमलकिशोर कंडारकर, ज्यांचा माता पित्यासह गौरव झाला. ते शुभम भोसले, रामेश्वर सबनवाड यावेळी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सगळ्यात महत्वाचे आहे तुमची इच्छा शक्ती, त्यानंतर अभ्यासाला लगणारी पुस्तकं, त्यातली पहिली गोष्ट मनाची इच्छा शक्ती जी सर्वस्वी तुमच्याशी निगडित आहे.

दुसरी बाब पुस्तकं आणि अभ्यासिका बाबतीत जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे. येणा-या काळात स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रातील मंडळींना बोलावून त्यांचे व्याख्यान चर्चासत्र ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहिल असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. यावेळी त्यांनी यशस्वी झालेल्या दोघांच्या पालकांचेही मनस्वी अभिनंदन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन दोघांचे अभिनंदन केले. शुभम भोसले आणि रामेश्वर सबनवाड यांनी आपल्या यशाच्या वाटा यशोशिखरापर्यंत कशा गेल्या हे सविस्तर सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या मनातील स्पर्धा परीक्षेविषयी असलेले प्रश्न, त्यांच्या शंका यावरही त्यांचे समाधान होईल असे उत्तर दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी केले. तर आभार जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी ग्रंथपाल पांडुरंग अडसुळे, जिल्हा ग्रंथालयाचे कर्मचारी, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या