24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeलातूरमांजरा धरणाने गाठली पन्नाशी; पाणीसाठा ५१.२३ टक्क्यावर

मांजरा धरणाने गाठली पन्नाशी; पाणीसाठा ५१.२३ टक्क्यावर

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूरसह केज, कळंब, अंबाजोगाई आदींसाठी जीवनदायी असलेल्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पाणी साठ्यात यंदाच्या पावसाळ्यात दररोज वाढ होत आहे. सद्यस्थितीत ११४.८२२ दलघमी पाणी साठा झाला आहे. उपयुक्त पाणी साठा ६७.६९२ दलघमी असून ५१.२३ टक्के साठा झाला आहे. यातील उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी ३८.२५ टक्के आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत या प्रकल्पात १०८.२९० दलघमी इतके नव्याने पाणी आले आहे.

लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या मांजरा प्रकल्पात दि. १ जुनपाासून पाण्याचा येवा सुरु झालेला आहे. १ जूनपासून २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत १०८.२९० दलघमी पाणी नव्याने आले आहे. प्रकल्पाचा एकुण पाणीसाठा २२४.०९ दलघमी आहे. उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता १७६.९६ दलधमी आहे तर मृतसाठा ४७.१३० दलघमी असून प्रकल्पाची पूर्ण संजय पातळी ६४२.३७ मीटर इतकी आहे. आजघडीला पाण्याची पातळी ६०१.५८ मीटर आहे. सन २०१६ च्या उन्हाळ्यामध्ये लातूर शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर त्याच पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने धरण भरले होते. गेल्या उन्हाळ्यापर्यंत याच पाण्यावर लातूरकरांची तहान भागली होती. खरे तर या प्रकल्पातील उपयुक्त पाणी दि. २७ सप्टेेंबर २०१८ रोजी संपले होते. तेव्हापासून यंदाच्या पावसाळ्यापर्यंत या प्रकल्पातील मृत पाणी साठ्यानेच लातूरकरांची तहान भागविली होती. दोन वर्षांनंतर यंदा मांजरा प्रकल्पात उपयुक्त पाणी साठा झाला आहे.

मांजरा प्रकल्पावरुन लातूर शहर, केज, धारुर, कळंब, अंबाजोगाई, आणि लातूर एमआयडीसीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु, गेल्या दोन वर्षांतील प्रकल्पातील मृत पाणी साठ्याची परिस्थित लक्षात घेता प्रशासनाने लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा काही काळ बंद केला होता. तर इतर योजनां पाणी कपातीचा फटका बसला होता. यंदा मात्र पाऊस चांगला पडत असल्याने मांजरा प्रकल्पात दररोज पाणी साठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे आजघडीला या प्रकल्पावरील सर्वच योजनांचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु आहे. लातूर शहराचा पाणी पुरवठा १० दिवसांवरुन ७ दिवसांवर करण्यात आलेला आहे.

दस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या