37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeलातूरअतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान ; शेतकरी संकटात

अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान ; शेतकरी संकटात

वांजरखेड्यात बनीम वाहून गेली ; तात्काळ मदतीची मागणी

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे सोयाबीन, ऊस खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील सोयाबीन सडले आहे, तर या अतिवृष्टीमुळे मांजरा नदीला आलेल्या पुरात वांजरखेडा शिवारातील हाकानी ईक्बालपाशा देशमुख यांची पाच एकर वरील सोयाबीनची बनीम वाहून गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे जिकीरीचे झाले असून कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या मागील दुष्टचक्र काही संपत नसून अनेक अडचणीचा सामना करताना शेतात काबाड कष्ट करून पिकविलेले सोयाबीन हाता तोंडाशी आले असताना अतिवृष्टीने हिरावून घेतल्याने शेतकरी हताश झाला असून सोयाबीन पाण्यात वाहून गेल्याने आता वर्ष भराचा खर्च कसा भागवायचा या कारणाने शेतकरी परेशान झाला आहे.

पावसाळ्यात गायब झालेला पाऊस अतिवृष्टीच्या रूपाने सक्रीय झाला. सप्टेबर व ऑक्टोबर मध्ये सततच्या दमदार पावसाने खरिप हंगामातील हाताला आलेले नासत आहे.संपुर्ण वर्षभराचा खर्च भागविणारे पिक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. कमी पावसासह अनेक अडचणीचा सामना करत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने सोयाबीन जगवले, पण या सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले असून उभे सोयाबीन सडून गेले. वादळी वाऱ्याने बनीमीवरील ताटपत्री उडाल्याने बनीम भिजल्या, रानांवरील सोयाबीन सडले, तर नदी नाले काठचे सोयाबीन व बनीम पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले असून आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

पाच एकर क्षेत्रांवरील सोयाबीन बनीम वाहून गेल्याने लाखोचे नुकसान.
सततच्या पावसाने मांजरा नदीला आलेल्या पुरात वांजरखेडा शिवारातील दोन एकरवरील व मुगाव शिवारातील तीन एकरवरील सोयाबीन काढून नदी काठी लावलेली सोयाबीनची संपुर्ण बनीम वाहून गेली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अगोदरच विविध अडचणीचा सामना करत असताना या अस्मानी संकटामुळे कुटूंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. नगदीचे पिक पाण्यात वाहून गेले आता या आर्थिक अडचणीत शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

हाकानी देशमुख
आपदग्रस्त शेतकरी
मुगाव

फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या