28.3 C
Latur
Thursday, March 30, 2023
Homeलातूरउदगीरच्या बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गैरसोय

उदगीरच्या बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गैरसोय

एकमत ऑनलाईन

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुका हा महाराष्ट्रात प्रगत व सर्वाधिक मोठा तालुका म्हणून गणला जातो या तालुक्याला कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश यांच्या सीमा अगदी जवळ असल्याने या राज्यातील लोकांशी रोटी बेटीचे व्यवहार चालत असतात. उदगीरची बाजारपेठ मराठवाड्यात मोठी असल्याने परराज्यातील लोकांची येथे ये-जा असते. या परिस्थितीचा विचार करुन प्रशासनाने उदगीर येथील जीर्ण बसस्थानक पाडून नवीन बसस्थानक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकामास सुरुवात केली आहे मात्र प्रवाशाच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था व्यवस्थित करून न दिल्यामुळे उदगीरच्या बसस्थाकात मोठी गैरसोय होत आहे.

उदगीर आगारातून उदगीर हैदराबाद, उदगीर निजामबाद, गुलबर्गा नांदेड, बिदर औरंगाबाद, उदगीर पंढरपूर, उदगीर पुणे, उदगीर सोलापूर, उदगीर मुखेड, उदगीर कंधार, उदगीर जळकोट,उदगीर लातूर उदगीर अहमदपूर उदगीर निलंगासह महाराष्ट्रच्या कानाकोप-यासह परराज्यातील कर्नाटक आंध्र प्रदेश या बसेस येतात. ोलंगणा, कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्याने तर उदगीरसाठी दर पंधरा मिनिटांनी कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश परिवहनच्या बसेस चालवून सर्व उदगीरचे बसस्थानक गिळंकृत केले आहे परंतु उदगीर अगाराला अपेक्षित बसेस पेक्षा खूपच कमी बसेस असल्यामुळे या आगाराने आजतागायत उदगीर निलंगा मार्गावर आपली एकही बस चालविली नाही. निलंग्यावरून उदगीर कडे येणा-या प्रवाशाला निलंगा अगारावर अवलंबून राहावे लागत आहे. अपुरी जागा अस्तावेत बसची पार्किंग, धूळ यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर ठेकेदाराने प्रवाशाच्या या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या