23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरशहर काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला मोठा प्रतिसाद

शहर काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला मोठा प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. ९ ऑगस्ट रोजी लातूर शहरात ‘आझादी गौरव पदयात्रा’ काढण्यात आली. पदयात्रेची सुरुवात स्वामी विवेकानंद चौक येथून करुन सुभाष चौक येथे समारोप करण्यात आल. या पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाने परकीय सत्तेच्या विरोधात दीर्घकालीन लढा दिला, अनेक नेत्यांनी या लढ्यात आपले सर्वस्व अर्पण केले, बलिदान दिले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेच्या हिताची धोरणे राबवून सक्षम, बलशाली राष्ट्र उभा केले, काँग्रेस पक्षाची ही कामगिरी, ध्येयधोरणे त्याचबरोबर त्याग आणि बलिदानाची परंपरा, पक्षाचा सर्वधर्मसमभावाचा विचार नव्या पिढीला अवगत करण्यासाठी या ‘आझादी गौरव पदयात्रा’चे आयोजन करण्यात आले आहे, पदयात्रा आयोजना मागचा उद्देश साध्य करण्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी होऊन परिश्रम घेत आहेत. १४ तारखेपर्यंत शहरात विविध भागात दररोज या आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

या पदयात्रेत काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र देहाडे, फरीद देशमुख, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, मोईजभाई शेख, स्मिताताई खानापुरे, सपनाताई किसवे, गोरोबा लोखंडे, विजयकुमार साबदे, गणपतराव बाजुळगे, विद्या पाटील, लक्ष्मण कांबळे, इम्रान सय्यद, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, अ‍ॅड. फारुख शेख, प्रा. प्रवीण कांबळे, जांिलदर बर्डे, दगडुअप्पा मिटकरी, अहेमदखान पठाण, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, सचिन मस्के, आयुब मणियार, रघुनाथ मदने, दत्ता सोमवंशी, तबरेज तांबोळी, दीप्ती खंडागळे, वर्षाताई मस्के, हमीद बागवान, हकीम शेख, आसिफ बागवान, इसरार सगरे, सुंदर पाटील कव्हेकर, ज्ञानेश्वर सागावे, विकास वाघमारे, सिकंदर पटेल, पंडित कावळे, अ‍ॅड. अंगदराव गायकवाड, अथरोद्दीन काजी, सुलेखाताई कारेपूरकर, कल्पनाताई मोरे, स्वाती जाधव, शीतल मोरे, कमलताई मोरे, मनीषा आदमाणे, केशरताई महापुरे, लक्ष्मीबाई बटनपूरकर, शीलाताई वाघमारे,जना सुरवसे,कुसुम यंचवाड, निर्मला जगताप, नैमून शेख, रेखा पुट्टेवाड, ताण्याबाई धुमाळ, अर्चना तलवारे, कमलबाई पेंढारकर, सुमन उडानशिव,पंचफुला जाधव, विमल साबणे, उषा चिकटे, संगीता जाधव, मनीषा पुंड, सुरेखा गायकवाड, अँड. सुनीत खंडागळे ,अभिषेक पतंगे,अभिजित इगे, अकबर माडजे, बालाजी झिपरे,आसिफ तांबोळी, सिद्धांत कांबळे, करीम तांबोळी, महेश शिंदे, गिरीश ब्याळे, गौस शेख, राजू गवळी, काशिनाथ वाघमारे, संदीपान सूर्यवंशी, राजकुमार गायकवाड, विकास कांबळे, आकाश मगर, कुणाल वागज, मेनोद्दीन शेख,आबु मणियार, पवन सोलंकर, पिराजी साठे, विष्णुदास धायगुडे, श्रावण मस्के, पवनकुमार गायकवाड, श्रीकांत गर्जे, विजयकुमार धुमाळ, धनंजय शेळके, राज क्षीरसागर, अजय वागदरे, बिभीषण सांगवीकर, राजेश गुंठे, रोहित वारडुले, दिनेश गोजमगुंडे, जहिर शेख, अमन सय्यद, अमोल गायकवाड, धनराज गायकवाड, जाफर शेख, आशुतोष मूळे, जय ढगे, खाजामिया शेख, डोंगरे,ओंकार लोखंडे, मारुती चव्हाण, युसूफ शेख आदी मान्यवर उपस्तिथ होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या