32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरशंभर महिलांनी कच-यालाच बनवला जगण्याचा आधार

शंभर महिलांनी कच-यालाच बनवला जगण्याचा आधार

एकमत ऑनलाईन

लातूर (एजाज शेख) : कोरोना महामारीने संपूर्ण जगाची धावपळ रोखली. उद्योगाची चाके थांबली, अनेकांच्या नोक-या गेल्या, कित्येक बेकार झाले, लाखो हात रिकामे झाले. परंतु, लौकीक अर्थाने अतिश्य दुय्यम असलेले झाडू मारण्याचे काम चक्क शंभर महिलांना आधार देणारे ठरले. लॉकडाऊनमध्ये या कच-यानेच महिलांना जगण्याची ऊर्जा दिली. कच-यातूनच रोजगार मिळवणा-या या महिला दररोज रात्री लातूर शहरात झाडलोट करण्याचे काम अविरतपणे करीत आहेत.

लातूर शहरातील स्वच्छतेचे काम महानगरपालिका व जनाधार सेवाभावी संस्थेच्या वतीने केले जाते. सन २०१७ पासून जनाधार सेवाभावी संस्था शहरातील रस्ते झाडणे, घंटागाडीच्या माध्यमातून घराघरातील ओला, सुका व घातक कचरा गोळा केला जातो. संकलीत केलेला कचरा लातूर शहरा जवळील नांदगाव येथील कचरा डेपोवर टाकला जातो. कचरा गोळा करणे, शहरातील रस्त्यांची झाडलोट करणे, कच-यावर प्रक्रिया करुन खत तयार करणे आदी कामे जनाधार सेवाभावती संस्थेच्या वतीने केली जातात.

शहरातील विलासनगर, बौद्धनगर, राजीवनगर, क्वॉईलनगर आणि औसा येथील शंभर महिला दररोज रात्री ८ वाजल्यापासून शहरातील रस्त्यांची झाडलोट सुरु करतात. दिवसभराच्या वर्दळीत स्वच्छतेची कामे करणे अवघड होते. त्यामुळे रात्री शहरातील रस्ते स्वच्छ करण्याची मोहिम सुरु होते. गंज गोलाई, मेन रोड, हनुमान चौक, गांधी चौक, लोकमान्य टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, औसा रोड, बार्शी रोड, अंबाजोगाई रोड आदी मुख्य रस्त्यांवर रात्री महिला हाता झाडू घेऊन रस्ते झाडत असतात. झाडलोट करुन कच-याचे ढिग लावतात. पाठीमागुन येणारी घंटागाडी तो कचरा उचलून नेते. चार तास काम करणा-या महिलेला ४ हजार तर आठ तास काम करणा-या महिलेला ८ हजार रपये वेतन दिले जाते. हे वेतन खुप मोठे नसले तरी कोरोना काळात कुटूंबाला आधार देणारे निश्चित आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये ७ हजार ५०० लोकांना या कच-यानेच रोजगार दिला आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात अद्रक शेतीचा प्रयोग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या