22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरवीज पडून पतीचे निधन, पत्नी भाजली

वीज पडून पतीचे निधन, पत्नी भाजली

एकमत ऑनलाईन

चाकुर : तालुक्यातील मौजे सांडोळ येथील शेतकरी नारायण सखाराम मुंडकर (वय ६५ वर्ष) यांचे दि़ १४ जुन रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वीज पडून जागीच मृत्यू झाला तसेच त्यांच्या पत्नी ही विजेमुळे भाजल्या आहेत. हे पती-पत्नी तसेच इतर काही जण खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतात करीत असताना अचानक जोरदार पाऊस आला तसेच वीजेचा गडगडाट सुरु झाला होता.

त्यामुळे हे सर्वजण आंब्याच्या झाडाखाली येऊन बसलेले होते. अचानक वीज त्या आंब्याच्या झाडावर कोसळली. मयत नारायण यांचे प्रेत पोस्टमार्टन करण्यासाठी चाकूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये आणण्यात आले होते. पोस्टमार्टन करुन प्रेत नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या