लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे़ तो रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत़ यापुर्वी वाहतूकीचे नियम जाहीर करुन त्यानूसार कारवाई करण्यात आली़ परंतु, त्या कारवाईनला न जुमानता वाहतूकीचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत असल्यामुळे जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांनी हे नियम अधिक कठोर करीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ केली आहे़ त्यानूसार आता दुचाकीवर डबल सीट आढळ्यास ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ दि़ १३ मार्च २०२० पासून लागु करुन खंड २, ३ व ४ मधील तरतूदीनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे़ याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे़ त्याअन्वये जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक असून सार्वजनिक स्थळी थुंकण्यास मनाई, चेह-यावर मास्कचा वापर करणे, शारिरीक अंतर पाळणे इत्यादी बाबी अनिवार्य करण्यात आलेल्या असून या कोरोना विषाणुचा होणारा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक आहेत़ या वैयक्तिक प्रतिबंधात्मक बाबींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत़ तथापी कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने अधिक प्रतिबंधात्क नियमावली तयार करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक वैयक्तिक शिस्त न पाळणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचाराधीन होती.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जी़ श्रीकांत यांनी लातूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत़ त्या उपाययोजनांचा एक भाग म्हणुन दुचाकी वाहनावर एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास ५०० रुपये, दोनपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास ७५० रुपये, आॅटोरिक्षात एक अधिक दोन पेक्षा जास्त प्रवासी आढळल्यास ५०० रुपये, चारचाकी वाहनामध्ये (कार) एक अधिक दोन पेक्षा जास्त प्रवासी आढळून आल्यास एक हजार रुपये दंड, अशी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे़ या आदेशाची अंमलबजावणी आजपासून होणार आहे़
२० रुपयांचा मास्क वापरा किंवा ५०० रुपये दंड भरा
साधा मास्क किंवा रुमाल बाजारात २० रुपयांना उपलब्ध आहे़ अगदी सामान्य माणुसही स्वत:च्या आरोग्यासाठी २० रुपये खर्च करुन चेहºयावर मास्क वापरताना दिसत आहे़ आता मास्क न वापरणे महागात पडणार आहे़ मास्कवर २० रुपये खर्च नाही केला तर ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार हे मात्र निश्चित.