25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरकोरोना बाधित आढळल्यास थेट कोव्हिड केअर सेंटरला रवानगी

कोरोना बाधित आढळल्यास थेट कोव्हिड केअर सेंटरला रवानगी

एकमत ऑनलाईन

लातूर : संचारबंदी, विकेंड लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरणा-या लोकांची लातूर पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमानाने तपासणी करून कोरोना बाधित आढळल्यास डायरेक्ट कोव्हिड केअर सेंटरला रवानगी करण्यात येत आहे. तसेच बाधित नसल्यास दंड आकारणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी, वीकेंड लॉकडाऊन केलेला आहे. तरीही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशा विनाकारण रस्त्यावर फिरणारे लोकांवर आळा बसवण्या करिता पोलीस अधीक्षक निखिल ंिपगळे यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी, उदगीर डॅनियल जॉन बेन, पोलीस निरीक्षक उदगीर शहर गोरख दिवे, पोलीस अमलदार व आरोग्य विभाग यांचे मार्फत उदगीर शहरांमध्ये विनाकारण बाहेर फिरत आहेत. अशा लोकांना थांबवून त्यांची अँटीजेन टेस्ट केली जात असून जे लोक पॉझिटिव्ह आहेत. अशा लोकांची कोव्हिड केअर सेंटरला रवानगी केली जात आहे. तसेच जे लोक पॉझिटिव्ह नाहीत, विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत अशा लोकांकडून दंड आकारला जात आहे.

उदगीर शहरात संयुक्त पथकाने १४८ लोकाची तपासणी केली असून त्यामध्ये १० कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांची कोव्हिड केअर सेंटर येथे पुढील उपचारासाठी रवानगी करण्यात आलेली आहे. सदरची मोहीम संपूर्ण लातूर जिल्हा मध्ये राबविण्यात येणार असून नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल ंिपगळे यांनी केले आहे.

राज्यात दिवसभरात ५०३ रूग्णांचा मृत्यू; ६८ हजार ६३१ कोरोनाबाधित वाढले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या