35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home लातूर गुटखा, तंबाखु, सिगारेटची अवैद्य विक्री जोरात

गुटखा, तंबाखु, सिगारेटची अवैद्य विक्री जोरात

एकमत ऑनलाईन

लातूर : गुटखा, सुगंधी तंबाखु विक्रीवर सरकारने बंदी घातलेली आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुटखा, तंबाखु, सिगारेट, पान विक्रीवर प्रतिबंध करण्यात आला आहे. गेली पाच महिने पानटप-या बंद आहेत. असे असले तरी गुटखा, तंबाखु, सुपारी, सिगारेटची अवैद्य विक्री मात्र जोरात सुरु आहे. या वस्तूंची गरज आणि मागणी पाहता दुपटी-तिपटीने विक्री होता आहे. सुपारी, गुटखा खाऊन थुंकणा-यांवर दंडा करणार तरी कोण ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोनोराचा संसर्ग वाढू नये, याकरीता सरकारने पानटप-या उघडण्यावर बंदी घातलेली आहे. मार्चपासून पानटप-या बंद आहेत. लॉकडाऊननंतर आता काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली असली तरी पान टप-यांवर मात्र अद्यापही बंदी आहे. पानटप-या राजरोजसपणे उघडता येत नसल्यातरी बंद दाराआड पानटप-यांचा व्यवसाय मात्र तेजीत आहे. ५ रुपयांना मिळणारा तंबाखुचा टोटा २५ रुपये, रत्ना, बाबा सुपारी, रजनीगंधा आदी सुगंधी सुपारीचे दर तर दुपटी, तिपटीने वाढले आहेत. १० रुपयांना मिळणारी सुपारी ३० रुपयांपर्यंत विकली जात आहे. बंद असणा-या पानटप-यांमधून दररोज लाखोंची अवैध उलाडाल सुरु आहे. यावर कोणाचेही नियंत्रण दिसून येत नाही.

पान टप-या सुरु केल्या तर अनेक लोक एकत्र येतील, पान, सुपारी खावून कोठेही थुंकतील. थुंकण्यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढेल, त्यामुळे पानटप-या बंद करण्याचा आदेशा सरकारने काढला. मात्र छुप्या पद्धतीने पानटप-यांचा व्यवसाय लाखोंच्या घरात चालतो आहे.

ऑनलाईन बुकींग करा, गुटखा खा…
वरवर पाहता पानटप-या बंद दिसतात. परंतु, पानटप-यांचा सर्व व्यवसाय हा ऑनलाईन सुरु आहे. मोबाईलवर गुटखा, सुपा-यांची ऑर्डर द्यायची आणि १० मिनीटे प्रतिक्षा करायची. पाहिजे ते जागेवर मिळत आहे. त्यामुळे एकीकडे पानटप-या बंद वाटत असल्या तरी अवैद्य मार्गाने हा व्यवसाय जोरात सुरु आहे.

सोमवारी पंढरपुरात विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन : पंढरपूरकडे येणारी एसटी सेवा बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या