22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरशेतक-यांनी अडविली अवैध वाळूची वाहने

शेतक-यांनी अडविली अवैध वाळूची वाहने

एकमत ऑनलाईन

निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील मांजरा व तेरणा नदीच्या संगमाच्या ठिकाणी प्रशासनाला हातशी धरून मोठया प्रमाणात अवैध वाळूची तस्करी केली जात आहे. औराद शाहाजानी वांजरखेडा रस्त्यावरून अवजड वाहणे जाऊन रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याची प्रशासनाला कल्पना देवूनही काहीच उपयोग होत नसल्याने अखेर शेतक-यांनी वाहणासमोरच ठिय्या आंदोलन करून वाळूने भरलेले दोन हायवा रोखून धरत प्रशासनाला जाग्यावर येऊन पंचनामा करून वाहणे औराद पोलीस ठाणेत जमा करण्यास भाग पाडले.

निलंगा तालुका महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने तेरणा व मांजरा पात्रात अवैध वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वाळू माफीयावर आवर घालण्यासाठी अनेक वेळा नदी काठच्या शेतक-यांनी तक्रारी करूनही प्रशासन गप्प होते. शिवाय अवजड वाहने औराद शहाजानी ते वांजरखेडा रस्त्यावरून वाळूने भरलेले मोठे हायवा टीप्पर ट्रॅक्टरची वर्दळ मोठया प्रमाणात वाढल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. वाळू कार्यवाही करण्याकरिता महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन तसदी घेत नसल्याने व रस्त्याची दुरावस्था झाल्याने या भागातील शेतकरी अक्रमक होत दहा ते पंधरा शेतक-यांनी अक्षरश: रस्त्यावर अवैध वाळूचे दोन हायवा आडवून महसूल प्रशासनाचे तलाठी व मंडळ अधिकारी यांना जाग्यावर बोलावून कारवाई करण्यास भाग पाडले आहे.

यावेळी औरादचे तलाठी बालाजी भोसले व तगरखेडचे तलाठी विशाल केंचे जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून अवैध वाळूने भरलेले दोन हायवा औराद शाहजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. यावेळी अमोल बोंडगे, आनंत भंडारे, कुमार बोंडगे, व्यंकट भंडारे, शिवपुत्र आग्रे, वामन भंडारे, इर्शाद पटेल, गणेश बोंडगे, विशाल बोंडगे, मुस्ताक नाईकवाडे, शिराज नाईकवाडे आदी शेतकरी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या