25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरलॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत धान्य वाटप करावे -...

लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत धान्य वाटप करावे – पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

एकमत ऑनलाईन

लातूर १७ एप्रिल : कोविड१९ प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे गरीब लोकांची अडचण होऊ नये याकरीता अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत अन्नधान्य वाटप सुरु करावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.

कोवीड १९ च्या दुसऱ्या लाटेत राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. प्रादुर्भावाची ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लॉकडाउन काळात गोरगरीब जनतेची अडचण होऊ नये, कोणीही उपासपोटी राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना प्मोफत देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानुसार अंत्योदय श्रेणीतील कार्डधारक एका कुटुंबाला एक महिन्यासाठी ३५ किलो तर प्राधान्य श्रेणीतील प्रत्येक व्यक्तीला गहू आणि तांदूळ मिळून एकूण ५ किलो धान्य मोफत मिळणार आहे.

लॉकडाऊन सुरू होऊन आता तीन ते चार दिवस झाले आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील अन्नसुरक्षा लाभार्थ्याना तातडीने मोफत धान्याचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी दिले असून जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, मनपा आयुक्त आयुक्त अमन मित्तल व इतर संबंधित अधिकारी यांना या योजनेची अंमलबजावणी प्रभावी होण्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी असे म्हटले आहे.

 

युध्दपातळीवर सज्ज व्हा ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उद्योगांना आवाहन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या