लातूर : जिल्ह्यात तसेच लातूर महानगर पालिका क्षेत्रात (कोव्हीड-१९) चा संसर्ग वाढत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी संबंधित विभागाने तात्काळ उपाय योजना राबवाव्यात, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित लातूर महानगरपालिका कोव्हीड-१९ च्या प्रतिबंधासाठी आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.
या बैठकीस महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मनपा आयुक्त देवीदास टेकाळे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना साथ रोगाचा संसर्ग वाढत असल्याने संबंधित विभागाने कोरोना प्रतिबंधासाठी तात्काळ उपाय योजना राबवाव्यात, शासन आपल्या पाठीशी असून घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपआपली काळजी घ्यावी. तसेच संबंधित विभागाने कोरोना बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आलेल्या हायरीक्स व लोरीक्स व्यक्तींचे ताबडतोबीने स्वॅब घेऊन योग्य ते उपचार करावेत अशा सुचना दिल्या.
तसेच महानगर पालिकेच्या घंटा गाडीद्वारे कोरोना प्रतिबंधासाठी जनजागृती करुन शहरातील कोणत्याही भागात कचरा साचणार नाही याची संबंधित विभागाने तात्काळ दखल घ्यावी अशी सुचना केली. तसेच शहरातील गाळेधारक, विद्युत पुरवठा, परिवहन, लघुउद्योग व्यापारी, स्वॉ मील यांच्या अडचणीबाबत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान शुशोभिकरण बाबतीत चर्चा करुन संबंधित विभागांनी या बाबत तात्काळ निर्णय घेण्याचे आदेशित केले.
या बैठकीस महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती अॅड. दीपक मठपती, परिवहन सभापती मंगेश बिराजदार, विरोधी पक्ष नेता अॅड. दीपक सुळ, उपायुक्त वसुधा फड, श्रीमती गुरमे, संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी मनपा आयुक्त देवीदास टेकाळे यानी बैठकीचे प्रास्ताविक केले तर उपायुक्त हर्षल गायकवाड यांनी आभार मानले.
महानगर पालिकेने रॅपीड टेस्टकीट तात्काळ खरेदी करा
लातूर महानगरपालिकेने कोरोना प्रतिबंधासाठी रॅपीट टेस्ट कीटची तात्काळ खरेदी करा, अशा सूचना पालकमंत्री अमित विलासराव देशामुख यांनी देऊन शहरातील प्रत्येक नागरीकांनी फिजीकल अंतर बाळगून कोरोना प्रार्दूभावपासून दूर रहावे, असे आवाहन केले.
Read More निलंग्यात एकाच दिवशी पंधरा ‘पॉझीटीव’