22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरसास-यांचे निधन होऊनही लसीकरण सेवा ठेवली सुरू

सास-यांचे निधन होऊनही लसीकरण सेवा ठेवली सुरू

एकमत ऑनलाईन

औसा (संजय सगरे) : रंजल्या गांजल्यांची सेवा करणे , आजारी व्यक्तीची शुश्रुषा करणे हा परिचारिकांच्या सेवेतील मुख्य भाग असतो़ कोव्हिड १९ च्या संकटात परिचारिकांनी अभूतपूर्व काम केले आहे. औशातील एका ज्येष्ठ परिचारिकेने सास-यांचे निधन झाले असतानाही दु:ख व भावनांना बाजूला ठेवून आजचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पुर्ण केले आणि परिचारिकादिन साजरा करीत असताना अनावर झालेल्या आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली़ संकट काळात प्रथम सेवा धर्म पाळून ख-या अर्थाने औशातील या परिचारिकेने जागतिक परिचारिकादिन साजरा केला आहे.

औसा ग्रामीण रुग्णालयात गेल्या वर्षीपासून कोव्हिड -१९ च्या महामारीत येथील परिचारिका अथकपणे सेवाकार्य करीत आहेत. येथील श्रीमती भाग्यश्री किरवे या प्रमुख परिचारिका आहेत. अतिशय शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक काम, वरिष्ठांच्या सूचनांचा आदरपूर्वक स्वीकार करुन सेवाकार्यात झोकून देऊन काम करीत असल्याने ग्रामीण रुग्णालयात सर्वांच्या तोंडी किरवे सिस्टर हे नाव असते. वैद्यकीय अधिकाºयांच्या नंतर किरवे सिस्टर हेच येथील कार्यभार सांभाळत असतात. कोरोनाचे मोठे संकट हाताळत असताना औसा ग्रामीण रुग्णालयात भाग्यश्री किरवे यांचा मोठा हातभार आहे. ग्रामीण रुग्णालयातील आपल्या सर्व सहकारी परिचारिकांना सोबत घेऊन श्रीमती किरवे हे सध्या लसीकरणाची जबाबदारी पार पाडत आहेत. कोरोनाशी लढणा-या भाग्यश्री किरवे यांच्या सासूबार्इंचे १९ एप्रिल रोजी कोरोनाने निधन झाले आहे.

सासूबार्इंच्या निधनाच्या दु:खात असताना जागतिक परिचारिकादिनी त्यांच्या सास-यांचे दुपारी उस्मानाबाद येथे निधन झाले. सध्या औसा ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगट व ४५ वर्षापुढील वयोगटातील लसीकरण दोन केंद्रांवर सुरू आहे. लसीकरणाला मोठी गर्दी आहे .शिवाय शहरातील काही संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी परिचारिका दिनानिमित्य सहकारी सर्व परिचारिकांचा सन्मान करण्यासाठी आले होते .

सन्मान करीत असतानाच श्रीमती भाग्यश्री किरवे यांना ‘आपले सासरे गेले’ असा निरोप आला.परंंतु सहकारी मैत्रिणींच्या आनंदात विरजण नको. काही अघटीत घडेल अशी कल्पना नसणाºया किरवे सिस्टरना ही बातमी समजली .ग्रामीण रुग्णालयात असलेले लसीकरण पूर्ण करुन रिपोर्ट दिल्यानंतर किरवे सीस्टरनी आपल्या दाटलेल्या अश्रुंना वाट मोकळी करुन देत आपल्या वरिष्ठांची परवानगी घेऊन पुढील विधीसाठीसाठी रवाना झाल्या . रुग्ण सेवेला प्राधान्य देत श्रीमती भाग्यश्री किरवे यांनी परिचर्य सेवाधर्म निभावला व ख-या अर्थाने जागतिक परिचारिका दिनाचा उद्देश सफल केला

रुग्णालयाच्या ठिकाणी गतीने ऑक्सिजन प्लांट उभारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या