22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरएसटीच्या उत्पन्नावर परिणाम

एसटीच्या उत्पन्नावर परिणाम

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने दि. १५ ते ३१ जुलै या कालावधीत जिह्यात संचारबंदी लागू केल्यामुळे जिल्हा अंतर्गत सुरु असलेली बससेवा गेल्या १५ जुलैपासून बंद आहे. बससेवा बंद असल्यामुळे लातूर एसटी विभागाच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, विभागाला दररोज सरासरी पाच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू केल्यामुळे २२ मार्चपासून जवळपास दोन महिने एसटी महामंडळाची बससेवा बंद होती. त्यानंतर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्य सरकारने काही अटींच्या अधीन राहून एसटी महामंडळाला जिल्हा अंतर्गत बससेवा सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर लातूर एसटी विभागाच्या वतीने २२ मे रोजीपासून जिह्यात तालुका ते तालुक्याचे ठिकाण व जिल्हा ते तालुक्याचे ठिकाण अशी बससेवा सुरु करण्यात आली.

सुरुवातीच्या टप्प्यात विभागातील पाचही आगारातून जवळपास ३७ बसेस सोडण्यात आल्या. यानंतर टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात आली आणि दररोज जवळपास ६५ बसेस सोडण्यात येऊ लागल्या होत्या. यातून लातूर एसटी विभागास दररोज
सरासरी पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते, अशी माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर यांनी दिली.कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाच्या वतीने सध्या जिह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे गेल्या १५ जुलैपासून जिल्हा अंतर्गत सुरु असलेली बससेवा बंद आहे. त्यामुळे लातूर एसटी विभागाला दररोज सरासरी पाच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर यांनी दिली.

Read More  १ कोटी ७८ लाखांचा विमा भरला

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या