24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरहातभट्टी दारू तयार करणा-यांवर छापा

हातभट्टी दारू तयार करणा-यांवर छापा

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणा-यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिलेले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली निलंगा तालुक्यातील कोराळवाडी येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणा-या ६ व्यक्तीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूरच्या पथकाने सकाळी छापामारी केली. यामध्ये ३ लाख ५३ हजार रुपयांचे रसायन, हातभट्टी दारू आणि हातभट्टी निर्मितीचे साहित्य नाश करण्यात आले आहे.

निलंगा तालुक्यातील कोराळवाडी येथे
शंकर मोहन बुकले, किशन सुभाष बुकले, उमेश पंडित बुकले, व्यंकट दौलाप्पा रेवणे, राम अण्णा सबदाडे, विकास अंगत गायकवाड हे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा, लातूरच्या पथकाने सकाळी छापामारी केली. यामध्ये ५ हजार ६०० लिटर रसायन, साहित्य तसेच १७५ लिटर हातभट्टीची दारू असा ३ लाख ५३ हजार रुपयांचे रसायन, हातभट्टी दारू आणि हातभट्टी निर्मितीचे साहित्य नाश करण्यात आले आहे. या ६ जणांवर कासारशिरशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, सहाय्यक फौजदार संजय भोसले, जमीर शेख, माधव बिलापटे, राजू मस्के, रवी गोंदकर, यशपाल कांबळे,
प्रकाश भोसले, बंटी गायकवाड, विनोद चिलमे, सिद्धेश्वर जाधव, केंद्रे, नकुल पाटील तसेच पोलिस ठाणे कासार शिरशी येथील पीएसआय गजानन क्षीरसागर, पोलिस हवालदार घोरपडे, पोलिस नायक भोंग, पोलिस अंमलदार हिंगमिरे, जाधव, सोनटक्के यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या