24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरकायद्यातील तरतुदींचे सखोल ज्ञान व योग्य अर्थ लावणे यशस्वी वकिलीचा मूलमंत्र

कायद्यातील तरतुदींचे सखोल ज्ञान व योग्य अर्थ लावणे यशस्वी वकिलीचा मूलमंत्र

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
यशस्वी विधिज्ञ व सल्लागार म्हणून कार्य करण्याकरिता कायद्यातील तरतुदींचे सखोल ज्ञान आणि योग्य अर्थ लावणे, आवश्यक असल्याचे प्रतिपादन सुप्रिम कोर्टतील प्रख्यात विधिज्ञ अ‍ॅड. आर. आर. देशपांडे यांनी केले. दयानंद विधी महाविद्यालय, लातूर येथे ढ’ीं्िरल्लॅ, ढ१ङ्मङ्मा ंल्ल िढ’ींीि१ या विषयावर व्याख्याना प्रसंगी लातूरचे भूमीपुत्र तथा दयानंद विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुप्रिम कोर्टातील प्रख्यात विधिज्ञ अ‍ॅड. देशपांडे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. पुनम नाथानी हे उपस्थित होत्या. यावेळी अ‍ॅड. आर. आर. शेट्टी यांची उपस्थिती होती.

मोठी स्वप्न बघितली पाहिजेत, त्याची पुर्तता करण्याकरिता प्रयत्न करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. जर आपण प्रयत्न केले तर आपली स्वप्न पूर्ण होतील. आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर सुप्रिमकोर्टात वकिली करण्याचे स्वप्नही सहजरित्या साध्य करू शकाल, असे सांगून अ‍ॅड. देशपांडे म्हणाले की, विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवातून नवीन दिशा दर्शविण्याकरिता त्यांच्या कारकिर्दीतील म्हणजेच तालुका कोर्ट ते सुप्रिम कोर्टापर्यंतचा त्यांचा प्रवास व त्यातील काही अनुभव त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. उन्नती जाधव यांनी केले. प्रत्यक्षात १५० विद्यार्थी व युट्यूबच्या सहाय्याने २०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या