27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरचार वर्षांत ७१ हजार शेतक-यांनी घेतला रूचकर जेवणाचा आस्वाद

चार वर्षांत ७१ हजार शेतक-यांनी घेतला रूचकर जेवणाचा आस्वाद

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शेतमाल तारण योजना, पशुधन आरोग्य शिबिर, शेतक-यांना ताडपत्री वाटप अशा विविध उपक्रमाच्या बरोबरच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतक-यांसाठी अल्पदरात भोजनाच्या नाविण्यपूर्ण उपक्रम गेल्या चार वर्षा पासून अखंड स्वरूपात राबविला जात आहे. या चार वर्षांत ७१ हजार ८६ शेतक-यांनी रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला आहे.

शेतमालाला योग्य भाव व रोख व्यवहाराचा विश्वास लातूरच्या आडत बाजारात असल्याने लातूर जिल्हयासह सिमेलगतच्या जिल्हयातील व राज्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी मोठया प्रमाणात घेऊन येतात. शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी ब-याच वेळेस सकाळी जेवण न करता घराबाहेर पडतात. या शेतक-यांना शेतमाल विक्री होईपर्यंत उपाशी रहावे लागतेकिंवा हॉटलमधील जेवणाचा आधार घ्यावा लागतो. शेतक-यांची ही आडचण लक्षात घेऊन लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतक-यांसाठी अल्पदरात (५ रुपयांमध्य पोटभर जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या जयंतीपासून (दि. २५ मे २०१८ पासून) राबवला जात आहे.

लातूर बाजार समितीने शेतक-यांसाठी सुरू केलेल्या अल्पदरात पोटभर जवनाचा आस्वाद लातूरसह परिसरातील जिल्हयातील तसेच सिमेलगतच्या राज्यातील ७१ हजार ८६ शेतक-यांनी घेतला. शेतक-यांना जेवनाच्या कुपनसाठी ५ रूपये खर्च येत या जेवनाच्या मेन्यू मध्ये चपाती, वरण, भात, एक भाजी, ठेसा, कांदा, लिंबू उपलब्ध असते. या अल्पदरात भोजनाचा अस्वाद उपक्रमाला शेतक-यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लातूर कृषि उत्पन्न बाजार समिती ग्रामीण भागातून आलेल्या शेतक-यांसाठी अन्नपूर्णा ठरत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या