30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरआशिया बुक ऑफ रेकॉर्ड करणा-या सृष्टी जगतापचा सन्मान

आशिया बुक ऑफ रेकॉर्ड करणा-या सृष्टी जगतापचा सन्मान

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूरच्या मातीतील बालकलाकार सृष्टी सुधीर जगताप हीने सलग २४ तास लावणीवर नृत्य करुन आशिया बुक ऑफ रेकॉर्ड करुन स्वत:चं, आई-वडिल, गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देशाचं नाव मोठं केलं. तिच्या या यशाबद्दल आदर्श मैत्री फाऊंडेशन विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या वतीने प्रसिद्ध उद्योजक दिलीप माने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विशाल जाधव, पत्रकार शशिकांत पाटील, आदर्श मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार, सुधीर जगताप, सौ. जगताप, आजोबा माने, फांऊडेशनचे संचालक प्रा. अविनाश सातपुते, शिवाजी हांडे, विवेक सौताडेकर, आशोक तोगरे, आसिफ शेख, अभिमन्यु जगदाळे, कल्पना फरकांडे, आविष्कार हालसे, विष्णू चव्हाण, महेश कदम, पवन कांबळे, गणेश जगदाळे, शुभम पोपळघट, सत्यवान भिंगोले, आरिफ शेख, श्रीराम श्ािंगण, मदन भगत, आशिष अंधारे, रुद्रायणी कोरके आदी उपस्थित होते.

यावेळी दिलीप माने, शशिकांत पाटिल, विशाल जाधव यांनी आपल्या मनोगतातीन सृष्टी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी सृष्टीने भावी जीवनामध्ये १६८ तास सलग लावणी नृत्य करुन गिनीज बुक रेकॉर्ड करणार असल्याचे सांगत आयएएस होण्याचा मानस व्यक्त केला तसेच आदर्शमैत्री फांऊडेशन विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने ईतका छान कार्यक्रम घेतल्या बद्दल फांऊडेशन अध्यक्ष संतोष बिराजदार यांचे आभार मानले.

नव्या ३५ कोरोना बाधितांची भर २८ जणांना सुट्टी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या