22 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home लातूर लातूर शहरात मुंबईहून आलेले २ रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह तर जिल्ह्यात ४ वाढले

लातूर शहरात मुंबईहून आलेले २ रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह तर जिल्ह्यात ४ वाढले

एकमत ऑनलाईन

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 78 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 11 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असून त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ते दोघेही मुंबई येथून प्रवास करून आलेले व्यक्ती आहेत तर 09 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 9 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Read More  पुण्यात एकाच दिवसात आढळले २०२ रुग्ण

जळकोट येथील एका व्यक्तींचे स्वॅब तपाणीसाठी आला होता त्या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बीड येथील 29 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या 22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 7 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व उस्मानाबाद येथील 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 25 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत असे एकुण 78 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 62 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 16 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकुर यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या