33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर लातूर जिल्ह्यात गावकारभा-यांसाठी ७८.८२ टक्के मतदान

लातूर जिल्ह्यात गावकारभा-यांसाठी ७८.८२ टक्के मतदान

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यातील ३८३ ग्रामपंचायतींसाठी दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत १ हजार ४३२ मतदान केंद्रांवर मतदान झाले. सकाळच्या पहिल्या दोन तासांत म्हणेज सकाळी ९.३० वाजेपर्यंत केवळ ११.६४ टक्के मतदान झाले होत तर सांयकाळी ५.३० वाजता सरासरी ७८.८२ टक्के मतदान झाले आहे. ग्रामीण भागाच्या विकाससाठी निगडीत ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शांततापूर्ण वातावरणात उत्साही मतदान झाले.

भारत निवडणुक आयोगाने लातूर जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम झाली केला होता. या निवडणुकीसाठी इच्छूकांनी मोठ्या प्रमाणात नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. एकीकडे निवडणुकीची तयारी तर दुसरीकडे बिनविरोध ग्रामपंचायत काढण्याच्या हालचाली झाल्याने जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील ३८३ ग्रामपंचायतींसाठी दि. १५ जानेवारी रोजी मतदान झाले. मतदानाच्या पहिल्या दोन तासांत फारसा उत्साह दिसला नसला तरी त्यानंतर मात्र मतदानाने वेग घेतला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ११.६४ टक्के, दूपारी १.३० वाजेपर्यंत ४७.८७ टक्के, दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६७.०४ टक्के तर सायंकाळी ५.३० वाजता ७८.८२ टक्के मतदान झाले. गावागावातील विविध पॅनलचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या घरापर्यंत जाऊन मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणून मतदान करुन घेत होते.

जिल्ह्यातील ३८३ ग्रामपंचायतींमधील १ हजार ३४१ प्रभागांतील ७ हजार २८६ उमेदवारांसाठी १ हजर ४३२ मतदान केंद्रांवर मतदान झाले. वलांडी, धनेगाव, जवळगा, विळेगाव, नेकनाळ, कवठाळा, इंद्राळ, हंचनाळ, उदगीर, वाढवणा बु., निडेबन, किनी यल्लादेवी, कुमठा, दावणगाव, नळगीर, बेलसक्करगा, येणकी, लोहारा, हंडरगूळी या संवेदनशील गावांसह जिल्हाभरात शांतापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. ११६ क्षेत्रीय अधिकारी व ८ हजार ५०० कर्मचा-यांनी ही मतदान प्रक्रिया पार पाडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रयेक मतदाराची थर्मल गणद्वारे तपासणी केली गेली.

क्वॉरंटाईन असलेल्या मतदारांना शेवटच्या तासात वेळ राखीव ठेवण्यात आले होते. या निवडणुकीसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील २ हजर ४०६ तर बाहेरुन बंदोबस्तासाठी आलेल्या १८२ पोलीस अधिकारी, कर्मचा-यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी ११, पोलीस निरीक्षक ३८, सहायक पोलीस निरीक्षक ६५, पोलीस कर्मचारी २ हजार ५४४ तर एसआरपीएफच्या दोन कंपन्या बंदोबस्तावर तैणात करण्यात आल्या होत्या.

७ हजार २८६ उमेदवारांचा निकाल सोमवारी
गावकारभारी निवडीसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यामुळे ३८३ ग्रामपंचायतींच्या ७ हजार २८६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. सोमवार दि. १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी तालुकास्तरावर होणाार आहे.

बनावट नोटाप्रकरणी आणखी दोघांना ६९ नकली नोटांसह अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या