22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७७९.९ मी. मी. पाऊस

लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७७९.९ मी. मी. पाऊस

एकमत ऑनलाईन

लातूर : पावसाच्या बाबतीत नेहमीच चिंतेचा विषय असलेल्या लातूर जिल्ह्यात यंदा पावसाने चांगलीच साथ दिली. जिल्ह्यात जुन महिन्याच्या पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर काही दिवस पाऊसच नव्हता. त्यामुळे सर्वांच्याच -हदयाचा ठोका चुकला कारण यंदाही कोरडा दुष्काळाची तर ही चाहुल नसेल, असे प्रत्येकांना वाटून गेले. परंतू, पावसाने हा अंदाज चुकवत सप्टेंबर महिन्यात सर्वत्र बसरला. त्यामुळे लातूर जिल्ह्यात पाणीच पाणी झाले. लातूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०२.१३ मी. मी. एवढी आहे. या तुलनेत आतापर्यंत ७७९.९ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. जळकोट तालुक्यात सर्वाधिक ९२५.३ मी. मी. पाऊस पडला आहे.

पावसाच्या बाबतीत नेहमी चर्चे राहणारा जिल्हा म्हणून लातूर जिल्ह्याची ओळख सर्वदुर आहे. कारण जिल्ह्यात कधी कसा पाऊस पडेल, किंवा पडणारच नाही, याबाबत कोणताही अंदाज कोणालाही वर्तवता आलेला नाही. यंदा मात्र पावसाने चांगलीच साथ दिली. लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असणा-या धनेगाव येथील मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले. ही लातूरकरांसाठी मोठी समाधानाची बाब आहे. कारण मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला तर सलग एक-दोन वर्षे चांगला पडतो. अन्यथा कोरडा दुष्काळ राहातो. २००१ ते २००५ ही सलग चार वर्षे तसेच २०२१ ते २०१६ ही सलग चार वर्षे अशाी आठ वर्षे व इतर पाच वर्षे मांजरा धरणात शुन्य टक्के पाणीसाठा होता. म्हणजे ४२ वर्षांत १३ वर्षे धरण रिकामे राहिले.

परिणाम पिण्याच्या पाण्यावर व सिंचनावर झाला. यंदाच्या मान्सूनमध्ये असमान पाऊस हे पावसाचे वैशिष्ठ्ये ठरले. जिल्ह्यात कुठे हलका, कुठे मध्यम, कुठे जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे काही महसूल मंडळात अतिवृष्टी तर काही महसूल मंडळात पाऊसच नाही, अशी परिस्थिती राहिली. जुन, जुलै आणि आगस्ट या तीन महिन्यांत जेमतेम पाऊस पडला. मात्र सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या टप्प्यात आणि आता शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात चांगला आणि सलग पाऊस पडत आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत पावसाने सर्वच चित्र बदलले. सलग आणि चांगला पाऊस पडत राहिल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसाने जिल्ह्यातील मांजरा, निम्न तेरणा हे दोन मोठे, आठ मध्यम व १३२ लघू असे एकुण १४२ प्रकल्प जलमय केले. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांपैकी ६ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. मांजरा पुर्ण क्षमतेने भरल्याने बुधवारी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे मांजरा नदी जलमय झाली. नदीवरील १५ बराजही दुथडी भरुन वाहत आहेत. चांगला पाऊस पडल्याने नदी, नाले, ओढे, धरणं भरुन वाहत आहेत. त्याचा आनंद असला तरी अतिपावसाने खरीप पिके धोक्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पिके पाण्यात असल्याने पिवळी पडू लागली आहेत, अशी शेतक-यांची तक्रार आहे.

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत पडलेला पाऊस (मि. मी.)
अ. क्र. तालुका एकुण पाऊस
१. लातूर ७४७.८
२. औसा ७१०.४
३. अहमदपूर ९१०.१
४. निलंगा ६४१.९
५. उदगीर ८८७.०
६. चाकुर ८०२.०
७. रेणापूर ८८२.६
८. देवणी ७२५.६
९. शि. अनंतपाळ ७२३.६
१०. जळकोट ९२५.३
एकूण ७७९.९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या