22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात पहिला डोस ४८.६४ टक्के तर दुसरा डोस २७.४७ टक्के नागरिकांनी...

लातूर जिल्ह्यात पहिला डोस ४८.६४ टक्के तर दुसरा डोस २७.४७ टक्के नागरिकांनी घेतला

एकमत ऑनलाईन

लातूर : ‘मिशन कवच कुंडल’ या मोहिमेअंतर्गत लातूर शहरात कोविड लसीकरणाला आता चांगला वेग आला आहे. दि. ८ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या मोहिमेला नागरिकांचा ब-यापैकी प्रतिसाद मिळत आहे. दि. १७ ऑक्टोबरपर्यंन पहिला डोस ४८.६४ टक्के तर दुसरा डोस २७.४७ टक्के नागरिकांनी घेतला आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहता ‘मिशन कवच कुंडल’ मोहीम दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.दि. ८ ते १४ ऑक्टोबर या सात दिवसांच्या कालावधीत १४ हजार ६०९ नागरिकांनी लस घेतली.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याचा कोविड लसीकरणाचा आढावा घेतला होता. त्याप्रसंगी त्यांनी लसीकरणाची गती वाढवावी, असे निर्देश दिले होते. त्यानूसार लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम जोरदारपणे राबविण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची पथके जाऊन नागरिकांना कोविड लस घेण्याबाबत प्रबोधन करुन लस घेण्याविषयी सांगत आहेत. लसीकरणाची ब-यापैकी जागृती झाल्यामुळे लातूर शहरात ‘मिशन कवच कुंडल’ ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

सन २०११ च्या जनगणनेनूसार लातूर शहराची लोकसंख्या ३ लाख ८२ हजार ९८५ एवढी आहे. सध्यास्थितील अंदाजीत मध्यवर्ती लोकसंख्या ४ लाख ५४ हजार ५११ इतकी आहे. १८ ते ४४ या वयोगटातील लोकसंख्या २ लाख ५ हजार ५०० आहे. ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकसंख्या ७५ हजार २०० आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लोकसंख्या ५३ हजार १०० आहे. कोविड लसीकरणास पात्र एकुण लोकसंख्या ३ लाख ३३ हजार ८०० एवढी आहे. त्यापैकी १ लाख ६२ हजार ३६७ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्याची टक्केवारी ४८.६४ एवढी आहे तर ९१ हजार ६९३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची टक्केवारी २७.४७ इतकी आहे. ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेस मिळणारा प्रतिसाद लक्षा घेता महानगरपालिकेने या मोहिमेला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे. आयएमएच्या सहकार्याने शहरातील २२ खाजगी हॉस्पिटलसमध्ये कोविड लसीकरणाची सोय महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. महानगरपालिकेचे २८ सेंटर आणि खाजगी हॉस्पिटलसमधील २२ असे एकुण ५० सेंटर्समध्ये कोविड लसीकरण केले जात आहे.

अद्यापही पावणे दोन लाख नागरिकांनी पहिलाच डोस घेतला नाही
शहरातील १ लाख ७१ हजार ४३३ नागरिकांनी अद्यापही कोविड लसीकरणाचा पहिलाच डोस घेतलेला नाही. तर २ लाख ४२ हजार १०७ नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. या नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.

शहरातील सर्वच प्रकारच्या दुकानदारांची तपासणी होणार
शहरातील सर्वच प्रकारच्या व्यापारी, दुकानदारांनी विजयादशमीच्या पुर्वी कोविड लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन महानगरपालिकचे आयुक्त अमन मित्तल यांनी केलेले होते. त्यानूसार आता विजयादशमीचा सण झालेला आहे. त्यामुळे शहरातील किती व्यापारी, दुकानदारांनी लस घेतली, याची तपासणी येत्या एक-दोन दिवसांत केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या