26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरलातूर जिल्ह्यात वाढले तब्बल ८८ रुग्ण

लातूर जिल्ह्यात वाढले तब्बल ८८ रुग्ण

एकमत ऑनलाईन

६० नवे, प्रलंबित अहवालातील २८ रुग्णांचा समावेश

लातूर : जिल्ह्यातून विविध कोविड सेंटरमधून तपासणीसाठी आलेल्या ४५५ स्वॅबपैकी २९८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर ६० जण पॉझिटिव्ह, ४६ अनिर्णित, १९ जणांचा अहवाल प्रलंबित, तर १९ जणांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे, तर दि. २० जुलैच्या प्रलंबित अहवालातील २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात बुधवारी तब्बल ८८ नवे रुग्ण वाढले आहेत. तसेच मृतांचा आकडा आता ६८ वर गेला आहे. दरम्यान, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने लातूरकरांची चिंता वाढली आहे.

लातूर जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात नव्या रुग्णांची भर पडत आहे. रोज ५० पेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत. त्यातच बुधवारी तब्बल ८८ रुग्ण वाढले. त्यापैकी ७६ रुग्ण कोरोना रुग्णांच्या संपर्कातील आहेत, तर ६ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. नव्या ८८ रुग्णांमुळे आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १३१५ वर पोहोचली असून, त्यापैकी ७०१ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ५४.०३ झाला आहे, तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३६ असून, त्यापैकी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक ५०४ आहे, तर मध्यम लक्षणे असलेले रुग्ण २४ असून, त्यांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर गंभीर असलेले ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ५२९ कंटेन्मेंट झोनपैकी सध्या ३३६ सुरू आहेत, तर १९३ कंटेन्मेंट झोन बंद करण्यात आले आहेत.

४१ रुग्णांना सुटी
एकीकडे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली, तरी कोरोनावर मात करून बाहेर पडणा-या रुग्णांची संख्याही काही कमी नाही. बुधवारी जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमधून कोरोनावर मात करून ४१ रुग्ण बाहेर पडले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ््या कोविड सेंटरमधून लातूरमधील २१, निलंगा येथील १५ आणि उदगीरमधील ५ रुग्णांना आज सुटी मिळाली.

या भागातील आहेत रुग्ण
लातूर जिल्ह्यात बुधवारी ८८ नवे रुग्ण आढळून आले. त्यातील २८ रुग्ण दि. २० जुलैच्या प्रलंबित अहवालातील आहेत. या २८ मध्ये लातूर शहरातील १९, उदगीर-६, चाकूर-२ आणि निलंगा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. लातूर शहरातील जीएससी रोड, शिवाजीनगर, केशवनगर, नांदेड रोड, क्वाईलनगर, साळे गल्ली, वैभवनगर-२, हाकेनगर, सरस्वती कॉलनी-२, काळे गल्ली-३, गांधीनगर-२, यशवंत सोसायटी या भागातील रुग्ण आहेत. उदगीरमध्ये विजयनगर, कॅप्टन चौक, बिदर रोड, रामनगर-२, जानापूर-२, चाकूर तालुक्यातील वडवळ, भाकरवाडी येथील प्रत्येकी १ आणि निलंगा शहरातील शिवाजीनगरच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

Read More  अनुभव : माझी कोविड-१९ ड्युटी

चाकूर तालुक्यात तीन नवीन पॉझिटिव्ह रुग्ण
तालुक्यातील नागेशवाडी, लातूररोड व राचन्नावाडी येथे प्रत्येकी एक कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर यांच्या संपर्कात आलेल्या नागेशवाडी येथील पाच तर राचन्नावाडी येथील तीन व्यक्तींना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले असून नागेशवाडी व लातूररोड येथील पॉझिटिव्ह रुग्ण हे या अगोदर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत तर राचन्नावाडी येथे अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता हा नवीन रुग्ण पुणे येथून पाच दिवसांपूर्वी गावात आला होता.

राचन्नावाडी येथील रुग्ण दोन दिवस गावात राहिला पण तो कोणाच्याही संपर्कात आला नसला तरीही खबरदारी म्हणून त्याच्या घरातील तीन व्यक्तींना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. आसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पंडगे यांनी दिली. त्यामुळे राचन्नावाडी येथील रुग्णाच्या घराच्या शेजारील चार घरे तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली राचन्नावाडी ग्रामपंचायतीने सिल केली आहेत. तर राचन्नावाडी येथे तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरच्यांना धीर दिला व त्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाईन राहण्याचा आदेश दिले.तर तो परीसर सील करण्यात आला आहे.

रुग्णाच्या घराजवळील चार घरांचा परिसर सील केला आहे. त्यावेळी तहसीलदार शिवानंद बिडवे,पोलिस उपनिरीक्षक एस. पी. जोंधळे, सिएचओ सुप्रिया मुंडे, एएनए एस. आर. गायकवाड,एम़ पी़ डब्ल्यू गणेश पवार गटप्रवर्तक सुरेखा बिडवे,अंगणवाडी कार्यकर्ती सुवर्णा घोडके, रत्­नाबाई श्रीमंगले, आशा कार्यकर्ती अनिता नागमोडे, गावचे सरपंच बंकट मलीशे,पोलिस पाटील गुणवंत पाटील,ग्रामसेवक विठ्ठल घुगे, तलाठी मौलाना शेख आदींनी येऊन पॉझीटीव्ह रुग्णाचा परिसर सील केला असून वाढवणा पोलिस ठाण्याचे एपीआय नरवटे, पोलिस उप निरीक्षक एस. पी. जोंधळे यांनी गावात येऊन नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी राचन्नावाडी येथे येऊन जनजागृती केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या