18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात आजपर्यंत ४९ हजार ५०४ नागरिकांनी घेतले दोन्ही डोस

लातूर जिल्ह्यात आजपर्यंत ४९ हजार ५०४ नागरिकांनी घेतले दोन्ही डोस

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार लातुर जिल्ह्यामध्ये ‘मिशन कवचकुंडल’ मोहीम दि. ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आजपर्यंत पहिला व दुसरा डोस ४९ हजार ५०४ नागरिकांचे लसीकरण करणयात आले.

लातुर जिल्ह्यामध्ये ‘मिशन कवचकुंडल’ ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सर्व विभागप्रमुख आयएमए, व्हीएसटीएस यांची बैठक घेऊन सर्व विभागांना सक्रिय सहभाग घ्यावा, असेही आवाहन केले आहे. ही मोहिम दि. ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मिशन कुंडल कवच मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कालावधीतील म्हणजेच दि. ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान आरोग्य विभागामार्फत जिल्ह्याामध्ये पहिला व दुसरा डोस नागरीकांना एकूण ४९ हजार ५०४ नागरीकांना देण्यात आले आहेत.जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात दि. ८ ते १४ ऑक्टोबर पहिला व दुसरा डोस ६ हजार ६४५, तर लातूर महानगरपालिकातंर्गत पहिला व दुसरा डोस ८ हजार ३९७ इतके लसीकरण झाले आहे.

लातूर जिल्ह्यात केंद्रावर लसीकरण सत्र आयोजित करण्यात आली असून या सत्रामध्ये ४९ हजार ५०४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरणाची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे पहिला व दुसरा डोस – ३२९, ग्रामीण रुग्णालय चाकूर येथे पहिला व दुसरा डोस – ३२२, ग्रामीण रुग्णालय देवणी येथे पहिला व दुसरा डोस-१८२, ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे पहिला व दुसरा डोस-२५५, पहिला व दुसरा डोस- ४०१, ग्रामीण रुग्णालय बाभळगांव येथे पहिला व दुसरा डोस-४०१, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे पहिला व दुसरा डोस-३६६, ग्रामीण रुग्णालय कासारशिरशी येथे पहिला व दुसरा डोस-१३३, ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे पहिला व दुसरा डोस- २३३, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे पहिला व दुसरा डोस-६४१, ग्रामीण रुग्णालय औसा येथे पहिला व दुसरा डोस-६७० इतके लसीकरण झाले आहे. उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पहिला व दुसरा डोस-४३५ उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथे पहिला व दुसरा डोस-२ हजार ६७८ इतके लसीकरण झाले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या