23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरमसलग्यात मोहर्रम सणात ंिहंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

मसलग्यात मोहर्रम सणात ंिहंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

एकमत ऑनलाईन

निलंगा : तालुक्यातील मसलगा येथील ंिहदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोहरम हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गेल्या तीन पिढ्यांपासूनची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा ंिहंदू- मुस्लिम एकतेचे दर्शन घडवून दिले आहे . मोहर्रम या सणाचे डोला हे विशेष आकर्षण असून सुलतान सय्यद , बालाजी ंिपड, नागनाथ नरहरे ,हनुमंत ंिपड, दस्तगीर शेख, गुरुनाथ ंिपड, परमेश्वर पवार, शिवाजी पवार, तानाजी शिंंदे, गोंिवंद शिंदे यांनी आपल्या हातची कलाकुसर दाखवत खास आकर्षक डोला तयार केला. मोहर्रम सणानिमित्ताने विशेष आकर्षणाने सजविण्यात आलेला डोला हा गावातील प्रत्येकाच्या दारापर्यंत वाजत गाजत नाचत घेऊन जाऊन प्रत्येक नागरिकांनी याचे दर्शन घेतले.

गेल्या तीन पिढ्यापासून ंिहदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असल्याने जिल्ह्यात येथील ंिहदू-मुस्लिम बांधवांनी एकतेचे दर्शन घडविले आहे. यावेळी मोहर्रम उत्सव समिती अध्यक्ष सुलतान सय्यद, उपाध्यक्ष बालाजी ंिपड, रमेश पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहनराव ंिपड, दिनकर पाटील, पोलीस पाटील, संतोष नरहरे, छावाचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके, विलास पाटील, गुरुनाथ जाधव आदींसह ंिहदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते .

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या