28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यात हरभ-याचा पेरा वाढला

शिरूर अनंतपाळ तालुक्यात हरभ-याचा पेरा वाढला

एकमत ऑनलाईन

शिरुर अनतपाळ : शकील देशमुख
तालुक्यात रबीची शंभर टक्के पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक १२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरा झाला आहे.एकूण १४ हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर रबी हंगामातील पिकांची पेरणी झाली असून रबी ज्वारीचे क्षेत्र घटले असून सुर्यफुल निरंक असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी एल.एम.खताळ यांनी दिली अतिवृष्टी व पुरामुळे खरिपाचे नुकसानीचे दु:ख बाजूला ठेवून शेतक-यानी संकटातून रबी पेरणी केली असून खरीप हंगाम हातचे गेल्याने आता शेतक-याचे अर्थकारण रबी हंगामावर अवलंबून आहे. तालुक्यात यंदा रबीसाठी १४ हजार ४३२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून यातील शंभर टक्के हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक १२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाचा पेरा झाला असून त्या खालोखाल १ हजार २३ हेक्टर क्षेत्रावर रबी ज्वारी, गहु १८३ हेक्टर,करडई ४७७ हेक्टर,रबी गळीत धान्य पिके ४७९,रबी मका १९ हेक्टर तर राहिलेल्या क्षेत्रावर इतर पिकांचा पेरा झाला आहे.

तालुक्यात यंदा अतिवृष्टी, संततधार पाऊस व पुरामुळे सोयाबीन सह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले.वार्षिक खर्च भागविणारे सोयाबीन हातचे गेल्याने शेतक-यांंचे अर्थकारण बिघडले. त्यात आता आर्थिक मदार ही हरभरा पिकांवर असून जमिनीतील ओलावा व पाण्याच्या मुबलकतेमुळे हरभ-याच्या रुपाने काही प्रमाणात का होईना आर्थिक नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यंदा रबी ज्वारीचे क्षेत्र घटले असून उन्हाळ्यात चा-याचा प्रश्न गंभीर होणार आहे.शेतकरी नगदी पिकांकडे वळले असून करडईचे पेरा घटला तर सुर्यफुल पेरा निरंक आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या