23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeलातूरशिरुर अनंतपाळ तालुक्यात बाधितांची संख्या घटली

शिरुर अनंतपाळ तालुक्यात बाधितांची संख्या घटली

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असून पॉझिटीव्ह होण्याचे काही प्रमाण घटल्याने बाधितांंपेक्षा बरे होणा-यांची संख्या वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पोलिस, महसूल व नगरपंचायत यांच्या अथक प्रयत्नामुळे कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोनाचा आकडा बाराशेवर गेला होता.मात्र शासनाच्या नियमाचे पालन,आवश्यक उपचार व प्रशासनाकडून योग्य समुदेशन होत असून त्याला नागरिकांतून सकारात्मक सहकार्य मिळाल्याने रूग्ण संख्येत होणारी वाढ थांबली आहे.आता कोरोना बाधितापेक्षा बरे होणा-यांच्या संख्येत वाढ झाली असून नागरिकांसाठी ही समाधानाची बाब आहे.दरम्यान तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १ हजार २५५ आहे.यातील तब्बल १ हजार २३ रुग्ण कोरोनाला हरवून घरी परतले आहेत. कोंिवड सेंटर शिरूर अनंतपाळ येथे २५ रुग्ण तर लातूर येथे २ रूग्ण उपचार घेत आहेत. सध्या सुमारे १७५ जण गृहविलगीकरण कक्षात असून आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ३० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात बुधवारी १६ नवीन रूग्णांची भर पडली आहे. एकूणच तालुक्यात पॉझिटीव्ह होण्याचे प्रमाण घटले असून बाधितांपेक्षा बरे होणा-याची संख्येत वाढ झाली आहे.

खबरदारी आणि काळजीची गरज
तालुक्यात रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र असले तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असून नियमित मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर, विनाकारण गर्दीत जाऊ नये,सध्या रुग्णसंख्या घटली असली तरी नागरिकांनी खबरदारी घेऊन कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे तहसीलदार अतुल जटाळे, पी. आय.परमेश्वर कदम,तालुकाआरोग्य अधिकारी डॉ.आर.एच.पवार व नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचीन भूजबळ यांनी केले आहे.

जिल्हा रुग्णालयात पाण्याअभावी रुग्ण, नातेवाईकांचे हाल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या