22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home लातूर घरफोडीत साडेदहा लाखांचा माल चोरीला

घरफोडीत साडेदहा लाखांचा माल चोरीला

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील गुणगुणेनगर भागात असलेल्या एका अपार्टमेंंटमधील फलॅटचे कुलूप तोडून चोरांनी दहा लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. गावाकडून बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी आणलेल्या २५ तोळे सोन्याच्या दागिन्यांवरच चोरांनी हा डल्ला मारला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील गुणगुणेनगर भागात व्यंकटेश अपार्टमेंट आहे. येथे प्रसाद गोविंद जामखंडे यांचा फलॅट आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणुन लॉकडाऊन सुरु आहे. जामखंडे येथे खाजगी क्लासेसमध्ये नोकरीला आहेत ते मुळचे उदगीरचे आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी आपल्या गावाकडून २५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन ते आले होते. येथील बँकेच्या लॉकरमध्ये हे सोन्याचे दागिने ठेवण्यात येणार होते., पण बँकेने चार दिवसांनंतर येण्याचे सांगीतल्याने जामखंडे यांनी हे सर्व दागिने घरात नेऊन कपाटात ठेवले होते. त्यात शहरात लॉकडाऊन सुरु असल्याने जामखंडे काही दिवसांपुर्वी उदगीरला निघून गेले.

फलॅटला कुलूपा राहिले फलॅटमध्ये कोणी नाही हे लक्षात आल्यानंतर दि. २९ जुलै रोजी चोरांनी या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश् केला. यात चोरांनी कपाटाचे कुलूप तोडूा २५ तोळे सोन्याचे दागिने व रोख तीन लाख रुपये, असा एकुण दहा लाख ५७ हजार ८९० रुपयांचा माल चोरुन नेला आहे.

Read More  जिल्ह्यात महायुतीचे दुध दरवाढीसाठी आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow