22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरचालू खरीप हंगामात लातूर जिल्हा बँक शेतक-यांना कर्ज वाटप करणार

चालू खरीप हंगामात लातूर जिल्हा बँक शेतक-यांना कर्ज वाटप करणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्यातील अग्रगण्य असणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने खरीप हंगामात पिक कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला असून सोयाबीन, तूर, मूग, उडिद, कापूस या पिकासाठी किसान क्रेडिट योजने अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत मर्यादेत अधीन राहून कर्ज वाटप करण्याचा निर्णय माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षेखालील झालेल्या .झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासाठी स्थानिक विविध कार्यकारी सहकारी संस्था किंवा नजीकच्या जिल्हा बँकेच्या शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीला माजी मंत्री दिलीपराव देशमुख, बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख, व्हॉईस चेअरमन अँड. प्रमोद जाधव, संचालक आमदार बाबासाहेब पाटील, संचालक अँड. श्रीपतराव काकडे, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक अशोकराव गोविंदपुरकर, संचालक जयेश माने, एन. आर. पाटील, अँड. राजकुमार पाटील, संचालक दिलीप पाटील नागराळकर, व्यंकटराव बिरादार, मारोती पांडे, अनुप शेळके, लक्ष्मीबाई भोसले, सौ सपना किसवे, सौ स्वयंप्रभा पाटील आदी उपस्थित होते.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रब्बी हंगामात उस व हरभरा पिकासाठी मोठया प्रमाणावर सहकारी संस्था मार्फत शेतक-यांना कर्जपुरवठा केला आसून चालु खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडिद कापूस या पिकासाठी जिल्हा बँक कर्ज वाटप करणार असून त्यासाठी नजीकच्याय जिल्हा बँकेच्या शाखेतकिंवा विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख, व्हॉईस चेअरमन अँड. प्रमोद जाधव, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, संचालक मंडळ यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या