मदनसुरी : द्रोणाचार्य कोळी
निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी अद्याप पर्यंत १५ व्या वीत्त आयोगाच्या माध्यमातून कोणतेही कामे झाली नसल्याची तक्रार गटविकास अधिकारी निलंगा यांना शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे अध्यक्ष सुरेश लामतुरे, उपाध्यक्षा प्रभावती जाधव, सदाशिव पाटील,शिवानंद मंगणे यांनी केली आहे.
कोकळगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे कंपाऊंड वॉलचे जागोजागी पडझड झाली असून ,मोकाट जनावरे शेळ्यामेंंढ्या,साप यांचा सर्रास प्रवेश शाळेतील प्रांगणात होतो आहे. यामुळे शाळेतील चिमुकल्यांना व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेतील शौचालयाची बिकट अवस्था झाली असून शौचालय विनाच शाळा असे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. स्वच्छतेचे पाठ शिकवणा-या शाळेच्या पाठीमागे अस्वच्छता व अडचण मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कंपाऊंडच्या भोवती उकिरडे, सरपण तसेच घाणीचे साम्राज्य वाढले आहे,
यामूळे शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये ंिवंचू का्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामसेवक व सरपंच यांना शालेय समितीच्या वतीने १५ व्या वीत्त आयोगाच्या माध्यमातून शाळेसाठी काम करण्यात यावे, असे वारंवार सांगूनही प्रत्यक्षात मात्र काम झाले नसल्याने, येथील शालेय ब्यावस्थान समितीचे अध्यक्ष सुरेश लामतुरे यांनी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कार्यवाही न झाल्यास पंचायत समिती निलंगा येथे आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.