लातूर : कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम दोन टप्यात राबविण्यात येत आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या मोहिमेतील दुस-या टप्यात ३ लाख ४८ हजार ४६० कुटंूबातील २३ लाख ५१ हजार ९७९ नागरीकांची ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
लातूर जिल्हयात कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी दि. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या टिम मार्फत राबविण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन लातूर जिल्हा परिषदेच्या १ हजार ३५९ आरोग्य पथकातील ४ हजार ७७ कर्मचा-यांकडून कुटुंबातील प्रत्येक नारीकांचे तापमान, ऑक्सजन तपासण्यात आले. आरोग्य विभागातील टिमला ३ लाख ४२ हजार २०१ कुटंूबातील १८ लाख ६६ हजार ९१० नागरीकांची आरोग्य तपासणी करण्याचे उदिष्ट दिले होते. लातूर जिल्हयातील ३ लाख ४७ हजार ९७० कुटंूबातील १८ लाख ३४ हजार ६६८ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेच्या दुस-या टप्यात लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दि. १६ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत ३ लाख ४२ हजार २०१ कुटूंबातील २५ लाख ९९ हजार ६४६ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दीष्ट होते. यात १ हजार ५५९ पथकातील ४ हजार ६७७ कर्मचा-यांनी ३ लाख ४८ हजार ४६० कुटंूबातील २३ लाख ५१ हजार ९७९ नागरीकांची ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
नागरीकांनी गाफील राहू नये !
जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाला आहे. सणा सुदीच्या दिवसात गर्दीत जाण्याचे टाळावे. नियमित हात धुवावेत, नाकाला व तोंडाला मास्क लावला पाहिजे. सुरक्षीत अंतर राखले पाहिजे. जिल्हयात पहिली लाट जरी ओसरत असली तरी दुस-या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून नागरीकांनी गाफील न रहाता योग्य ती काळजी घेतली पाहीजे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले.
७० हजार नागरीकांना जडले विविध आजार
दुस-या टप्यातील आरोग्य तपासणीत ६९ हजार ६०५ नागरीकांना डायबेटिझ, बी. पी., -हदयरोग, किडनीचे आजार आदी आजार असल्याचे दिसून आले. ६९७ नागरीकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. तर ३६० नागरीकांना सारी सदृश्य आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून आले. तसेच विविध आजाराच्या १० हजार ३०९ नागरीकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय येथे संदर्भ सेवा दिली.
मॅग्नेटिक महाराष्ट्र : राज्यशासनाचे ३४ हजार ८५०कोटींचे सामंजस्य करार !