25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरवलांडीत ८८ वर्षीय सौदागर यांची कोरोनावर मात

वलांडीत ८८ वर्षीय सौदागर यांची कोरोनावर मात

एकमत ऑनलाईन

देवणी (अन्वरखाँ पठाण) : देवणी तालुक्यातील वलांडी येथील ८८ वर्षीय हाजी जाफरसाब हसनोद्दीन सौदागर यांनी कोरोनाच्या दुस-या लाटोवर मात करून खरे कोरोना योद्धा ठरले आहेत. हाजी जाफरसाब सौदागर यांना २१ एप्रिल रोजी कोरोनाचे लक्षणे जाणवू लागल्याने त्याना उदगीर येथील खाजगी तथा कोविड रुग्णालयात तपासणी केली व तेथील डॉक्टरनी गृहविलगीकरण करण्याचा सल्ला दिला व औषधोंपचार सुरू केले वलांडी येथे गृहविलगीकराणामध्ये असताना अचानक त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हाजी जाफरसान याचे सहा मुले पदवीधर असून तीन शासकीय सेवेत आहेत. त्याचे सर्व मुलो हे ५० वर्षाच्या पुढचे वयाचे आहेत. वयाचा विचार करता जाफरसाब याचे सर्व तरुण नातवंडापैकी एक नातू डॉक्टर व आठ नातू आभियांत्रीकी शिक्षण पूर्ण केले. नातवांनी आजोबाची सेवा करण्याचा मानस केला व जाफरसाब याच्या एकाही मुलाला त्यांच्या संपर्कात येऊ दिले नाही. तर रुग्णालयात आजोबांची सेवा व देखभाल नातवानी केली व त्यांच्या सुना लातूर येथे खोली घेऊन सास-यासाठी शासनाच्या निर्देशानुसार सकस व योग्य आहाराची सेवा कोली व अखेर कोरोनाच्या दुस-या तीव्र लाटेवर हाजी जाफरसाब सौदागर यानी मात केली.

योग्य चाचण्या व आहार महत्त्वाचा
याबाबत त्यांचे नातू डॉ. जावेद सौदागर म्हणाले की कोरोनाचे लक्षणे जाणवताच योग्य त्या चाचण्या करून घ्यावेत व उपचारादरम्यान सकस आहार दिल्यास कोरोनावर सहज मात करू शकतो यांचे उदाहरण म्हणजे माझे ८८ वर्षीय आजोबा होय.

दिग्गजांच्या साथीमुळे अवताडेंचा विजय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या