24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरभाजपात प्रवेशीत नेत्यांच्या फायली कुठल्या शीतगृहात ठेवताय?

भाजपात प्रवेशीत नेत्यांच्या फायली कुठल्या शीतगृहात ठेवताय?

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही त्या राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. ईडी, सीबीआयच्या कारवाया भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांमध्येच कशा होतात. भाजपाने काही नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. ते नेते भाजपात प्रवेश करताच त्यांच्या फायली भाजपाने कोणत्या शीतगृहात ठेवलया?, असा सणसणीत प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला विचारला आहे.

खासदार सुप्रिया सुळे शनिवारी लातूर जिल्ह्याच्या दौ-यावर आल्या होत्या. त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. त्याप्रसंगी त्यांनी भाजपाच्या राजकीय कार्यपद्धतीवर सडकावून टिका केली. राजकारणात इतकी कटूता कधीच पाहिली नव्हती, असे नमुद करुन खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, भाजपाकडून सुढबुद्धीचे राजकारण केले जात आहे. त्याचा थेट परिणाम समाजकारणावर होत आहे. माणसं एकमेकांपासून दुरावत चालली आहे. देशाची एकता आणि अखंडतेला या गोष्टी बाधक ठरत आहेत.

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आरोपांच्या भोव-यात सापडलेल्या आर्यन खान याला अमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीने क्लीन चीट दिली. हा निर्णय म्हणजे सत्याचा विजय आहे. आर्यन खान याच्या विरुद्धचे आरोप खोटे आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते नवाब मलिक यांनी सातत्याने नमुद केले होते. हा फर्जीवाडा असल्याचे सांगत त्यांनी खुलेआमपणे टीका केली होती. अखेर मलिक यांचेच म्हणणे खरे ठरले. मात्र सत्यासाठी आवाज उठवणा-या मलिकांना आज अन्यायास सामोरे जावे लागत आहे, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

समाजासमाजात तेढ निर्माण करुन आपले इप्सीत साध्य होते काय? असा प्रयत्न करणारे आता उघडे पडून लागले आहेत. भोंग्यांच्या विरोधात रान उठविणा-यांनी खरोखरच ते भोंगे उतरले का, याचे विश्लेषण करावे, असा सल्ला देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी पंढरपुर-शिर्डी या देवस्थानांसह गावोगावच्या मंदिरांवरील भोंगे मात्र बंद झाले, अशी खंत व्यक्त केली. यावेळी राज्य मंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या