24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते अल्पहारम हॉटेलचे उद्घाटन

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते अल्पहारम हॉटेलचे उद्घाटन

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील हनुमान चौक येथील रवींद्र (मिनू शेठ) अग्रवाल यांच्या लातूरमधील पहिल्या साउथ इंडियन व फास्ट फूडच्या अल्पहारम हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार देशमुख यांनी हॉटेलची पाहणी करून रवींद्र अग्रवाल कुटुंबीयांना पुढील व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितकुमार शहा, रमेश राठी, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, उद्योजक अजय ठक्कर, कमल जोधवानी, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, अशोक (गट्टू शेठ) अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, निखिल अग्रवाल, सागर अग्रवाल, सी. ए. प्रकाश कासट, कमलकिशोर अग्रवाल, अंकित अग्रवाल, निलेश अग्रवाल, श्रीलाल अग्रवाल, व्यंकटेश पुरी, सुरज गडदे, अकबर माडजे, अभिजीत इगे, बालाजी झिपरे, पवन सोलंकर आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी अग्रवाल कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र अग्रवाल यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यंकटेश नरसिंगे यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर राजेंद्र अग्रवाल यांनी आपल्या ग्राहकांसाठी पार्किंगच्या ठिकाणाहून येण्या-जाण्यासाठी मोफत इलेक्ट्रिक रिक्षाची व्यवस्था केली आहे. त्या रिक्षाचे आमदार देशमुख यांनी पाहणी करुन ग्राहकांना मोफत सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या