18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeलातूरकिल्लारी पोलिस ठाणे हद्दीत सीसीटीव्हीचे लोकार्पण

किल्लारी पोलिस ठाणे हद्दीत सीसीटीव्हीचे लोकार्पण

एकमत ऑनलाईन

किल्लारी: येथे पोलीस ठाणे हद्दीतील गावापैकी किल्लारी, मंगरुळ, गाढवेवाडी गावात सीसीटीवीचे लोकार्पण अप्पर पोलिस अधीक्षक देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. सपोनी सुनील गायकवाड यांच्या पुढाकारातून व लोक सहभागातुन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून चोरी, गुन्हेगारावर आळा बसविण्यात यश मिळवले आहे. कार्यक्रमाच्या आध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मधुकर पवार हे होते अप्पर अधीक्षक अजय देवरे म्हणाले की, एपीआय सुनिल गायकवाड यानी सीसीटीव्ही काँमेरा उपक्रम राबविला तो लातूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या पोलीस ठाण्यांनी आदर्श घेऊन राबवावा. यामुळे पोलीस खात्याला मदत होणार आसून गुन्ह्याचा तपासाला गती तसेच गुन्हेगारी प्रवत्ती, चोरी, मुलीची छेड आशा आनेक गुन्ह्यांवर आळा बसणार आहे

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर पवार, पिएस आय प्रशांत राजपूत, पिएसआय एसआर माने पिएसआय ढोणे, डॉ. अशोक पोतदार, महादेव पाटील, माजी उपसभापती किशोर जाधव, सरपंच विकास पाटील, सरपंच विठ्ठल बेडजवळगे, गौरीशंकर बालकुदे, विजय माने बिटजमादार भोळे गौतम, सचीन उस्तुर्गे, गणेश यादव,किसन मर्डे, आबासाहेब इंगळे, कृष्णा गायकवाड, एसएस कांदे आय एच शेख, दत्ता गायकवाड, एसआर कावळे, टिबी चव्हाण, पि एस येरनवाड, मेजर बन, मिरा जाधव, श्रीदेवी गुनाळे, अर्पणा साळुंके, अनिता मोरे, भाग्यश्री जोडपे यांच्यासह गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे आध्यक्ष, व्यापारी, नागरीक उपस्थीत होते. सुत्रसंचलन आडगळे यानी केले

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या