24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते जनसेवा मल्टीसर्विसेसचे उद््घाटन

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते जनसेवा मल्टीसर्विसेसचे उद््घाटन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्त दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील इकबाल चौक येथील काँग्रेसचे बूथ प्रमुख मूनवर शेख व ईरफान शेख यांच्या जनसेवा मल्टीसर्विसेस (सीएससी) सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, अ‍ॅड. फारुक शेख, माजी नगरसेवक सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, राम चलवाड, महेश काळे, सुपर्ण जगताप, सुमित खंडागळे, विजय टाकेकर, किरण बनसोडे, राजक्षिरसागर, मैनोद्दीन शेख, अंगद गायकवाड, विष्णुदास धायगुडे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व बूथ प्रमुख परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरला आपले कुटुंब मानले तीच परंपरा आम्ही पुढे घेऊन जात आहोत, लातूर बद्दल आमच्या मनात कुठलीही तडजोड राहत नाही. लातूर हे आपलं आहे, लातूर तुमच व माझ आहे, या भावनेमुळे लातूरची प्रगती झाली आहे. लातूर हे आपलं घर आहे असे प्रत्येकाला वाटते लातूरची प्रगती लातूरच्या संस्कृतीमुळे होत आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवा मल्टी सर्विसेसचे संचालक मूनवर शेख यांनी केले तर माजी नगरसेवक सचिन बंडाप्पले यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रभाग क्रमांक २ मध्ये सुरु असलेली कामे व भविष्यात करण्यात येणा-या कामाची सविस्तर माहिती दिली,

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या