19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeलातूरमाजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते रेमण्ड शोरुमचा शुभारंभ

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते रेमण्ड शोरुमचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जे जे नवं ते ते लातूरला हवं, हा येथील जनतेचा ध्यास असल्यामुळे हे शहर अत्यंत वेगाने विकसित होत आहे, असे नमूद करुन त्यात आता रेमंड (व्हर्जन-३) या नवीन दालनामुळे शहराच्या वैभवात आणखीन भर पडलेली असल्याचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले.

शहरातील अंबाजोगाई रोडवरील मयुरा लॉज शेजारी लातूर प्लाझा येथे सचिन मालू यांच्या रेमंड (व्हर्जन-३) शोरुमच्या शुभारंभा प्रसंगी माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, द रेमंडचे अधिकारी विक्रांत नितनवरे, अ‍ॅड. समद पटेल, सचिन दाताळ, रमेश सूर्यवंशी, प्रवीण घोटाळे, नितीन मालु, शिवप्रसाद लाहोटी, जुगलकिशोर कासट, कचरुलाल कासट, भूषण कासट, केदार लाहोटी, डॉ. चेतन सारडा, अजय दुडिले, पारिख, इमरान सय्यद, बालाप्रसाद बिदादा, फैजलखान कायमखानी, प्रा. प्रवीण कांबळे, प्रा. एम. पी. देशमुख, अमोल माने, अविनाश बट्टेवार आदीसह मालू कुटुंबीय, मित्रपरिवार, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूरकरांना व्यवसाय, उद्योग, व्यापार करण्यासाठी सदैव पोषक वातावरण राहील याची आम्ही कायम खबरदारी घेतो. तर लातूरकरांनीदेखील योग्य दिशेने योग्य प्रकारे काम केले म्हणून सगळीकड लातूरकरांच कौतुक करतात, लातूरची तुलना इतर जिल्ह्यांशी केली तर लातूरमध्ये जे अनुभवायला मिळते ते इतर जिल्ह्यांत मिळत नाही. आज मराठवाड्यातील पहिल्या रेमंड (व्हर्जन-३) शोरुमच्या रुपाने एक चांगले दालन लातूरमध्ये सुरू झालेले आहे, असेच नवनवीन इतरही दालनासह लातूरच्या चारी दिशांना रेमंड शॉपचे दालन सुरू व्हावे, असे सांगून ही नाविन्यपूर्ण संकल्पना लातूर शहरात साकारते याचा मला आनंद असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, लातूरकरांना व्यवसाय उद्योग व्यापार करण्यासाठी सदैव पोषक वातावरण राहील याची आम्ही कायम खबरदारी घेतो. लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरची एक संस्कृती निर्माण केली, त्यामुळे लातूरकर हव्या त्या क्षेत्रात प्रगती गुंतवणूक करू शकतात. येथे सर्वांना स्वातंत्र्य आहे, लातूरमध्ये गेल्या ४० वर्षांमध्ये एकही उदाहरण सापडणार नाही की, एखाद्या व्यवसायिकाला व्यवसायासाठी अडचण आली आहे. लातूरमध्ये प्रत्येकाला मोकळा श्वास घेता येतो, असे सांगून त्यांनी मालू कुटुंबीयांना व्यवसायाच्या वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन मालू यांनी करुन रेमंड शॉपची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सीए नंदकिशोर मालपाणी यांनी मानले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या