27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरकृषी महाविद्यालयात स्वराज्य महोत्सवाचा शुभारंभ

कृषी महाविद्यालयात स्वराज्य महोत्सवाचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी व युवकांमध्ये सजग समाजभान, लोकशाही मूल्य, जीवनमूल्य, देश भावना तसेच जाज्वल्य देशभक्ती सचेतन व वृंिद्धगत करण्याच्या उद्देशाने येथील कृषी महाविद्यालयात स्वराज्य महोत्सवाचा शुभारंभ झाला. यावेळी आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी यांच्या संकल्पनेनुसार व संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता, डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनानुसार व कृषी महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या पुढाकारातून स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम आयोजित करुन स्वराज्य महोत्सव साजरा होत आहे. दि. १ ऑगस्ट रोजी या महोत्सवाचे उद्घाटन आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आले. आमदार विक्रम काळे आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड महत्त्वाची असून कृषी महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर वृक्ष संवर्धन होत आहे ही अत्यंत सकारात्मक व आनंदाची बाब आहे. मानवी जीवनामध्ये वृक्षाचे महत्व अनन्यसाधारण आहे. वृक्ष हे मानवास सावली, फळे व ऑक्सिजन देतात त्यामुळे वृक्ष हेच खरे मानवाचे मित्र होत.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे आपल्या भाषणात म्हणाले की, देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड व संवर्धन करणे काळाची गरज असून या महाविद्यालयात याबाबत सर्वांच्या सहकार्याने हे कार्य होत आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्­ठाता व प्राचार्य डॉ. हेमंत पाटील, गळीत धान्य संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. महारुद्र घोडके, कृषी विस्तार विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे व कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पद्माकर वाडीकर हे उपस्थित होते तर कार्यक्रमास डॉ. आनंद कारले, डॉ. विश्वनाथ कांबळे, डॉ. भागवत इंदुलकर, डॉ. दिनेशंिसह चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिलकुमार कांबळे यांनी केले तर आभार डॉ. विजय भांमरे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत करंजीकर, डॉ. विलास टाकणखार, डॉ. विठोबा मुळेकर, डॉ. व्यंकट जगताप, जिमखाना उपाध्यक्षा डॉ. ज्योती देशमुख, प्रा. संतोष कांबळे, डॉ. राजेश शेळके, डॉ. अनंत शिंदे, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिलकुमार कांबळे, डॉ. संघर्ष शृंगारे, डॉ. प्रभाकर आडसूळ, डॉ. दयानंद मोरे, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ. सुनिता मगर, प्रा. ममता पतंगे, प्रा.भगवान कांबळे, राहूलदेव भवाळे, रासेयो स्वयंसेवक विद्यार्थीनी सुहर्षा वसमतकर, स्नेहल सपाटे, विशाखा वंजारे, गिताश्री जाधव, ज्योती माकणे, वैष्णवी नाईकनवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या