17.3 C
Latur
Friday, November 27, 2020
Home लातूर जिल्ह्यातील १० हजार लोकसंख्येच्या गावांचा समावेश

जिल्ह्यातील १० हजार लोकसंख्येच्या गावांचा समावेश

एकमत ऑनलाईन

लातूर : सद्यस्थितीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचातत्वासोबत जीवनपद्धती अंगीकारणे गरजेचे आहे. या पंचतत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान हे राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत असून लातूर जिल्ह्यातील लातूर महानगरपालिका, सर्व नगरपरिषद, सर्व नगरपंचायती व दहा हजार लोकसंख्येचे सर्व गावांमध्ये दि. २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत असून सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित माझी वसुंधरा अभियान व जिल्ह्यातील नगरपंचायती, नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे, जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, प्रवीण मेंगशेट्टी, विकास माने, अविनाश कांबळे, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांच्यासह सर्व नगरपंचायती, नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी राज्याच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियानाची माहिती सांगून या अभियानात जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कशा पद्धतीने सहभाग घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच या अभियानात पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या प्रत्येक बाबीवर कशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करून घ्यायचे तसेच पर्यावरण पूरक कामे कशा पद्धतीने राबवायची याची माहिती देऊन यातील प्रत्येक बाबीवर गुणांकन केले जाणार असून त्या पद्धतीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे असे निर्देश त्यांनी दिले. लातूर जिल्ह्यात यापूर्वी सेव्हन स्टार अभियान राबविण्याबाबत सूचित करण्यात आले होते. या पर्यावरणपूरक अभियानात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांनी

ऑनलाईनव्दारे कर भरणा करावे, ओला-सुखा कचरा वेगळा करणे, घरातील सर्व वीज उपकरणे पर्यावरण पूरक वापरणे, घरात किमान एक तरी बाब सौर ऊर्जेंची वापरणे, नळाला मीटर लावणे, सुखा- कचरा वेगळा करुन प्रक्रिया करणे, जलपूर्नभरण उपक्रम राबविणे या सात बाबी व अन्य पर्यावरणास पूरक बाबींची यादी करुन त्याची जनजागृती करावी. व या बाबींचा नागरिकांनी वापर केल्यास त्यांना किमान ५ ते १० टक्के मालमत्ता करात सवलत दयावी, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले.

माझी वसुंधरा अभियान राबविताना स्थानिक स्वराज्य संस्थांनी सायकलिंगचा ग्रुप तयार करावा. तसेच सायकंिलगसाठी सकाळचा काही कालावधी विना वाहन झोन तयार करावा. त्या वेळेत त्या रस्त्यावरुन फक्त सायकंिलगची परवानगी असेल. तसेच वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन दयावे. व सामान्य नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण करण्यासाठी प्रबोधनात्मक मोहिम राबवावी, तसेच पार्किंगच्या ठिकाणी इलेक्ट्रीक वाहनासाठी चार्जिंगच्या सुविधा निर्माण करुन ठेवाव्यात. वृक्ष लागवड, घनकचरा व्यवस्थापन, शहरांचे सौदर्यीकरण, हगणदारीमुम्त शहरे, गावे या बाबी प्राधान्याने राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केल्या.

मुलुंड रूग्‍णालय जमिन खरेदीत १२ हजार कोटींचा घोटाळा !

ताज्या बातम्या

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

आणखीन बातम्या

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

आ. सतीश चव्हाण यांच्या विजयाची हॅट्रिक साधून महाविकास आघाडीची एकजूट दाखवून द्यावी

लातूर : विधान परिषदेच्या मराठवाडा मतदार संघातून आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयाची विक्रमी मताधिक्­याने हॅट्रिक साधावी आणि या निमिताने महाविकास आघाडीची एकजूट दाखवून द्यावी,...

बीड जिल्ह्यातील गेवराईनजीक कन्टेंनर-कारचा भीषण अपघात; वंचितच्या जिल्हाध्यक्षासह चार जण ठार

रेणापूर : (सिद्धार्थ चव्हाण) बीड जिल्ह्यातील गेवराईपासून दोन किलोमीटर अंतरावर कार व ऑईल कन्टेनरचा भीषण अपघात होऊन कारमधील पाच जणांपैकी तिघे जण जागीच ठार...

लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गाचे अधिका-यांकडून सर्वेक्षण

औसा (संजय सगरे ) : प्रस्तावित लातूर ते गुलबर्गा या नवीन रेल्वे मार्गाबाबत सर्व्हे करण्यासाठी रेल्वेच्या अधिका-यांची टिम नुकतीच लातूर, निलंगा व उमरगा तालुक्यात...

कचऱ्यावर प्रक्रियेचा असाही लातूर पॅटर्न, निम्म्या लातूर शहराच्या ओल्या कचऱ्यापासून बनतोय खत!

लातूर : लातूर शहराला कचरामुक्त करण्यासाठी महानगरपालिका सरसावली आहे. केवळ कचरा गोळा करून कचरा डेपो येथे पाठविण्यावर न थांबता त्यावर सुनियोजित पद्धतीने पक्रिया करण्यावर...

कोरोनाविषयक निर्देशांचे पालन करा; अन्यथा दंडात्मक कारवाई

लातूर : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. राज्यपातळीवर वाढती रुग्णसंख्या पाहता परराज्यातून येणा-या नागरिकांसाठी काही अटी व शर्ती घालण्यात आलेल्या आहेत....
1,348FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...