22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeलातूरजळकोट तालुक्यात ‘आधार’ची सुविधा नसल्याने गैरसोय

जळकोट तालुक्यात ‘आधार’ची सुविधा नसल्याने गैरसोय

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यात एक लाखाच्या वर लोकसंख्या आहे. या एक लाख लोकसंख्येसाठी जळकोट तालुक्यामध्ये आधार कार्ड काढणे अथवा ते दुरुस्त करण्यासाठी कुठलीही ही केंद्र नाही यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत असून जळकोट तालुक्यात आधार केंद्र नसल्यामुळे तालुक्याची जनता आधारच्या बाबतीत निराधार झाल्याचे दिसून येत आहे परंतु याकडे वरिष्ठ अधिका-यांचे दुर्लक्ष होत असून, तात्काळ ही सुविधा सुरू करावी अशी मागणी होत आहे.

केंद्रातील यूपीए सरकारने सर्वप्रथम आधार कार्ड अनिवार्य केले होते, या आधार कार्डमुळे व्यक्तीची संपूर्ण ओळख होत होती, तसेच या आधार कार्डचा वापर सर्वच शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय विविध शाळा तसेच विविध बँका यामध्ये होत आहे आधार कार्ड शिवाय सध्या कुठलीही कामे होत नाही जर आधार कार्ड नसेल तर त्या व्यक्तीला अनेक कामांना मुकावे लागत आहे त्यामुळे सध्या आधार कार्ड आहे अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे.

जळकोट तालुक्यातील अनेक नागरिकांनी आधार कार्ड काढून घेतले होते, प्रशासनानेही ही सुरुवातीला आधार कार्ड काढण्याच्या बाबतीत नागरिकांना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी गावातच कॅम्प लावले होते या कॅम्प मध्येच अनेकांनी आपले आधार कार्ड काढून घेतले परंतु अनेक व्यक्ती असे आहेत की की उद्यापही आधार कार्ड काढलेले नाहीकिंवा गहाळ झालेली आहे यामुळे नवीन आधार कार्ड काढण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

जर आधार कार्ड काढून खुप वर्ष झाली असतील तर त्यांचा अंगठा लागत नाही, तसेच नवीन जन्मलेल्या मुलांचे आधार कार्ड काढावे लागत आहेत, तसेच पॅन कार्ड काढण्यासाठीकिंवा बँकेत खाते काढण्यासाठी आधार कार्डची गरज भासू लागली आहे, बँकेत खाते काढायचे असेल तर पॅन कार्ड ची गरज लागू लागली आहे, आणि पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड वरील जन्म तारीख गृहीत धरण्यात येत आहे, परंतु ज्या नागरिकांची आधार कार्डवर आपली जन्मतारीख, नसेल अशांना मात्र आधार कार्ड अपडेट करून नाव अथवा जन्मतारीख बदलून घ्यावी लागत आहे.

हे सर्व बदलण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागत आहे परंतु हे सर्व अपडेट करण्यासाठीकिंवा नवीन आधार काढण्यासाठी जळकोट तालुक्यात कुठेही सोय नसल्याची दिसून येत आहे, त्यामुळे जळकोट तालुक्यातील नागरिकांना एक तर मुखेड तालुक्यात जावे लागत आहेकिंवा उदगीर तालुक्याला जावे लागत आहे, त्यामुळे अनंत अडचणी चा सामना जळकोट तालुक्यातील नागरिकांना करावा लागत आहे, जळकोट हे तालुक्याचे ठिकाण असूनही आधार कार्डच्या बाबतीत याठिकाणी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे, जळकोट बरोबरच जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागातही आधार केंद्र सुरू करण्याची गरज होती .

नागरिकांची होणारी गैरसोय तात्काळ दूर करावी
जळकोट हे तालुक्याचे ठिकाण असूनही या ठिकाणी गत अनेक महिन्यापासून आधार काढणेकिंवा आधार कार्ड अपडेट करणे ही सुविधा बंद आहे, पूर्वी काही शासनमान्य केंद्रावरून पैसे देऊन असे अपडेट करण्यात येत होते परंतु तेही गत अनेक महिन्यापासून बंद झाले आहे. त्यामुळे जळकोट तालुक्यातील नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठीकिंवा अपडेट करण्यासाठी इतर तालुक्याचा आधार घ्यावा लागत आहे. जळकोट पासून जवळ असलेल्या जांब येथे जावे लागत आहे. यामुळे प्रशासनाने तात्काळ जळकोट येथे आधार कार्ड काढण्याची सोय करावी.
-नितीन धूळशेट्टे
(तालुका अध्यक्ष,
विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस)

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या