23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरजळकोट येथे रस्त्यावर पाणी साठल्याने गैरसोय

जळकोट येथे रस्त्यावर पाणी साठल्याने गैरसोय

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ असलेल्या मुख्य रस्त्याला चक्क तलावाचे स्वरूप आले आहे. येथे रस्त्यावर सखल भाग झाल्यामुळे येथेच पाणी थांबून राहत आहे यामुळे नागरिक तसेच वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे . जळकोट शहरातील आंबेडकर चौकापासुन महात्मा फुले चौकापर्यंत जाण्यासाठी असलेल्या प्रमुख रस्त्यावर पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे. जळकोट शहरात दि ११ मे रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर या ठिकाणी पाणी साठले आहे.

गत दोन वर्षांपासून या ठिकाणी असेच पाणी साठून राहत आहे. या साठलेल्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास तर होतच आहे तसेच आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता निर्माझ झाली आहे. यामुळे नगरपंचायतीने या प्रकरणी कार्यवाही करुन नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे .

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या